अण्णांचे विकासाशी नाते : ‘जल जीवन’ योजना त्यांच्या सततच्या पाठपुराव्याचा परिणाम
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : चारा घोटाळा, वाळू घोटाळा आणि अवैध धंद्यात यांचा सातत्याने सहभाग असल्याचे आढळून आले अशा राजेंद्र मस्केंनी पत्रक काढून स्वत:च्या अकलेचे दिवाळे काढले आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे कोणत्याही पक्षात असले किंवा नसले तरी त्यांच्या शब्दाला जी किंमत आहे ती आपल्या पत्रकाला तरी आहे का? असा सवाल करत राजेंद्र मस्के यांनी आधी माहिती घ्यावी आणि नंतर बोलावे. असा इशारा सुधाकर मिसाळ, संजय सानप, सतीश काटे, संतोष कंठाळे, सुभाष क्षीरसागर, सुलेमान पठाण, सभापती उषाताई सरवदे, जयदत्त थोटे, संदीप डावकर, सचिन घोडके, महारु द्र वाघ, रविंद्र मिटकरी यांनी दिला आहे.

कोणतीही योजना एका दिवसामध्ये तयार होत नसते त्याच्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागतो. कृती आराखडा तयार होत असताना ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावाची गरज, योजनेचा सर्व्हे, योजनेचे अंदाजपत्रक आणि संबंधित विभागाचे अधिकारी या सर्वांचा समन्वय साधून पुढे प्रशासकीय मान्यता प्राप्त होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावे लागतात. पुढे तांत्रिक मान्यता निविदा प्रक्रि या राबवुण घेणे. कार्यारंभ आदेश नंतर चांगल्या दर्जाचे काम व्हावे त्यासाठी प्रयत्न करावे लागतात तेव्हा योजनेचे फलित होत असते. फक्त पत्रक काढून या बाबी परिपूर्ण होत नसतात आणि त्याचे श्रेय ही घेता येत नसते.
जल जीवन मिशन या योजनेचे यापूर्वीचे नाव राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना असे होते. पाणीपुरवठा मंत्रालयात दि.29 जून 2018 रोजी मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कृती आराखडा तयार करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.त्यानुसार पाणीपुरवठा नळ योजना राबवणे बाबत योग्य ती अंमलबजावणी आणि कार्यवाही करणेबाबत आवर सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र पा.पू.व.स्व.वि.-01/सी.आर. 40 -2018 दिनांक 24 जुलै 2018 यांनी पत्र दिले होते. त्यानुसार 2018 मध्ये त्याचा कृती आराखडा ही तयार करण्यात आला होता. एकदा एखाद्या गावामध्ये नळ योजना झाल्याच्या नंतर कमीत कमी दहा वर्ष त्या गावासाठी नळ योजना घेता येत नाही. या योजनांचा कृती आराखडा 2018 मध्ये तयार झालेला आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेचे नामकरण आता जलजीवन मिशन असे झालेले आहे. त्यावेळी ही सर्व संबंधित गावे या कृती आराखड्यामध्ये तत्कालीन आ. जयदत्त क्षीरसागर यांनी समाविष्ट करणे बाबत कसोशीने प्रयत्न केले होती. उर्वरित गावे 2019 मध्ये रोहयो मंत्री असताना पाठपुरावा करून ही अधिकची गावे पाणीपुरवठा योजनेमध्ये समाविष्ट करून घेणेबाबत माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे पाठपुरावाही केला होता. जल जीवन मिशन योजना ही अत्यंत उत्कृष्ट योजना असून सर्वसामान्यांची तहान भागवण्याचे काम योजनेतून होणार आहे. आपण केलेलं काम आपण दिलेलं योगदान हे तसेच संबंधित योजनेचा प्रचार आणि प्रसार जनसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे त्यासाठी राजकारण करण्यात येऊ नये अशा या पुण्ण्याच्या कामांमध्ये जळावु वृत्ती तर असूच नये . उलट मोठ्या मनाने संबंधित सर्व योजनांचे कामे दर्जेदार कशी होतील यासाठी योगदान द्यावे.
जलजीवन मिशन ही योजना सध्या अमलात आली असली तरी हीच योजना पूर्वी जलस्वराज व राष्ट्रीय पेयजल योजना म्हणून राबवली गेली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 2018 पासून सातत्याने या योजनेतून ग्रामीण भागात फायदा व्हावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी संबंधित मंत्री आणि त्या खात्यातील सचिवांना सातत्याने पाठपुरावा करून गावोगाव या योजनेचा फायदा मिळून घेतला आहे. जलजीवन मिशन ही योजना आता अिस्तत्वात आली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे प्रमुख असल्यामुळे त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असतात क्षीरसागर हे कोणत्या पक्षाचे आहेत यापेक्षा त्यांच्या शब्दाला किती महत्त्व आहे हे यापूर्वीच सिद्ध झालेले आहे. उदाहरण द्यायचेच असेल तर बीडमध्ये मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी आग्रही मागणी केली आणि जवळपास 20 हजार कोटी खर्च असलेला मराठवाड्यासाठी पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी मिळावे यासाठीचा प्रस्तावित प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याला राज्य सरकारकडून मंजुरी देखील मिळाली आहे, त्यामुळे पक्ष महत्त्वाचा नसून त्यांचे नेतृत्व हेच महत्त्वाचे आहे. छावणी घोटाळा करून वाळू घोटाळ्यात जेलची हवा खाऊन आलेल्या राजेंद्र मस्केंनी आधी या योजनांचा अभ्यास करायला हवा होता. या योजनेसाठी आपण नेमके कोणते प्रयत्न केले? हे जनतेसमोर आधी मांडावेत आणि नंतर प्रसिद्धीसाठी पत्र काढावे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अवैध धंद्यांना कधीही साथ दिलेली नाही आणि देतही नाहीत. आपण योजना मिळवण्यासाठी कोणते दिवे लावले ते जनतेसमोर दाखवून द्यावेत, असा सवाल सुधाकर मिसाळ, संजय सानप, सतीश काटे , संतोष कंठाळे, सुभाष क्षीरसागर, सुलेमान पठाण, उषाताई सरवदे, जयदत्त थोटे, संदीप डावकर, सचिन घोडके, महारु द्र वाघ, रविंद्र मिटकरी यांनी केला आहे.