स्वागताध्यक्ष मानसिंग पवार यांची माहिती
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : उद्योग क्षेत्रासह सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सत्यनारायणजी लाहोटी यांचा अमृत महोत्सव सोहळा बीडमध्ये 10 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती राहणार असून हा सोहळा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती अमृत महोत्सव सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष मानसिंग पवार यांनी दिली.
बीडमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी विविध समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेत न भुतो न भविष्यती असा हा सोहळा व्हावा अशा सुचना समितीती सर्व पदाधिकार्यांना दिल्या. सत्यनारायणजी लाहोटी अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त स्वागत समिती मंडप समिती, भोजन समिती, व्यासपीठ समिती, प्रसिद्धी समिती, पार्कींग व्यवस्था समिती आदी समित्या गठीत करण्यात आल्या असून जिल्ह्यातील आणि शहरातील विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी या संघटनांमध्ये असणार आहेत. या सोहळ्यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक बंब, श्रीकिसनजी कल्याणी, नाशिकचे विक्रम सारडा, औरंगाबादचे राम भोगले, राम बंधु मसल्याचे हेमंत राठी, उमेश दाशरथी, स्वारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे, बीडचे आ. संदिप क्षीरसागर यांच्यासह मराठवाड्यातील इतर लोकप्रतिनिधी, व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी मराठावाडा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
प्रत्येक समितीचा आढावा आणि पुढील कामकाजाचे निर्देश, स्वागताध्यक्ष मानसिंग पवार यांनी यावेळी समितीतील पदाधिकार्यांना दिले. सत्यनारायण लाहोटी यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले असून त्याचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा. आणि त्यामाध्यमातून हजारो सत्यनारायण लाहोटी तयार व्हावेत हीच भुमिका या सोहळ्यामागील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीसाठी कार्याध्यक्ष एस.पी.लड्डा यांनी औरंगाबादचे पाल, वाय जनार्धनराव यांच्यासह विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी बांधव, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.