आठ संघाचा सहभाग; आंतरविद्यापीठ संघाची झाली निवड
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येथील मिल्लिया महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 11 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन लॉन टेनिस स्पर्धा-2022 चे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉक्टर विवेक पालवनकर (उपाध्यक्ष चंपावती क्रीडा मंडळ बीड) यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. हुसेनी, उपप्राचार्य तथा क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सय्यद हनीफ, विद्यापीठ पंचप्रमुख म्हणून प्राध्यापक डॉ. सचिन देशमुख, डॉ. विजय मेहेर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. अताऊल्ला जागीरदार यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी डॉक्टर विवेक पालवणकर यांनी खेळ खेळण्यासाठी वयाचे बंधन नसते. इच्छा, ध्येय, शक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. खेळ हे जीवनाला कलाटणी देणारे आहेत, प्रत्येकाला स्वतःच्या आरोग्याविषयी जाणीव झाली पाहिजे असे सांगितले. तर, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस.एस. यांनी खेळाडूंनी खेळ हा फक्त खेळाच्या भावनेनेच खेळावा. खेळ खेळणे शारीरिक व मानसिक संतुलनासाठी चांगले असते. विद्यार्थ्यांमध्ये खेळासाठी जागृती निर्माण व्हावी, तसेच लॉन टेनिस खेळायला प्रोत्साहन दिले पाहिजे तरच चांगले खेळाडू तयार होतील असे सांगितले.
या स्पर्धेमध्ये आठ संघाने सहभाग घेतला होता. यावेळी आंतरविद्यापीठ संघाची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रिडा विभाग प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. सय्यद हनिफ यांनी केले तर आभार प्रोफेसर मिर्झा असद बेग यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. रमेश वारे, डॉ. फारुख सौदागर, डॉ. सायरी अब्दुल्ला, विविध महाविद्यालयाचे क्रिडा संचालक व विद्यार्थी- खेळाडू यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.