व्यक्तीमत्व विकासासाठी युवकांनी खेळाला प्राधान्य द्यावे – राजेंद्र मस्के
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आजच्या डिजिटल जगात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. स्वस्थ व सदृढ शरीरात मानवी मनाचा सर्वांगीण विकास होतो. प्रत्येक व्यक्तीने जीवनात खेळाला महत्व दिले पाहिजे. किमान छंद म्हणून, तरी खेळ खेळावा. खेळामुळे शरीर मजबूत होते. चपळता आणि खेळाडू वृत्ती वाढते. स्पर्धेच्या युगात यश संपादनासाठी युवकांनी खऱ्या अर्थाने खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. असा सल्ला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी युवा बांधवांना दिला आहे.
आज वडवणी येथे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री बाबरी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वडवणी प्रीमियम लिगचा शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र मस्के यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी श्री बाबरी मुंडे, नगरसेवक सर्वश्री ज्ञानदेव राठोड, हरिदास टकले, भीमराव उजगरे, इस्माईल पठाण, वडवणी शहरातील प्रतिष्ठित पारसमल नहार, अमरसिंह मस्के, महादेव जमाले, भाई उजगरे, पोपटराव शेंडगे, गणेश तोडेकर, बद्रीनाथ जटाळ, महेश सावंत, आदी उपस्थित होते. युवा नेते बाबरी मुंडे वाढदिवसानिमित्ताने अनाठायी खर्च न करता विधायक कामातून वाढदिवस साजरा करतात. ग्रामीण भागातील खेळाडू युवक आणि क्रीडा रसिकांसाठी स्पर्धेचे केलेले आयोजन कौतुकास्पद आहे.
बाबरी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गतवर्षीही भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी प्रथम रोख पारितोषिक 77777 व द्वितीय पारितोषिक 44444 ठेवले आहे. भव्य स्पर्धेमुळे परीसातील युवकांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळते. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना आपले नैपुण्य दाखवण्याचा योग यानिमित्ताने मिळतो.यामुळे परिसरातील युवक आणि क्रीडा प्रेमी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद देतात.