राष्ट्रवादीचे आंदोलन : जोरदार निषेध, काळे झेंडे फडकावले, पोलिसांकडे तक्रारी अर्ज
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या नेत्या तथा खासदार संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्याविरोधात खालच्या थरावर जाऊन टिप्पणी केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हाभरात राष्ट्रवादी चे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहिर निषेध केला.
बीडमध्ये निदर्शने आंदोलन
बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेठी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकावुन मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शिंदे गटाचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्यावर 50 खोक्यावरून टीका केली होती. या दरम्यान अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल गलिच्छ शब्दांचा उल्लेख केला होता. एका जबाबदार संवैधानीक पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे.
खा.सुप्रियाताई सुळे या आमच्या नेत्या असून त्यांच्या बद्दल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल त्यांनी जाहिर माफी मागावी. अशा प्रकारचे गलिच्छ वक्तव्य तेही एका महिलेबद्दल करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर आहे. सत्तारांची सत्तेची मस्ती ही जास्त दिवस नसणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे आम्ही सर्व पदाधिकारी त्यांची मस्ती उतरवल्याशिवाय शांत बसणार नाहीत, खा.सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी निषेध व्यक्त करतांना आ. संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. दरम्यान बीड राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, काळे झेंडे दाखवत आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री सत्तारांच्या विरोधात गेवराई राष्ट्रवादी आक्रमक
गेवराई : मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा.सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून महिला लोकप्रतिनिधींचा अवमान केला आहे. राज्याच्या मंत्र्याकडून असे वक्तव्य करणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्यासारखे आहे. मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात गेवराई राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. माजी आ.अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्यावतीने गेवराई पोलिस ठाण्यात ठिय्या देवून अब्दुला सत्तारांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली. या बाबतचे लेखी निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.
गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने गेवराई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी ही घटना असल्यामुळे अब्दुल सत्तारांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी यानिमित्ताने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शाहीन पठाण, शहराध्यक्षा मुक्ताताई आर्दड, जय भवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, माजी जि.प.सभापती भरतराव खरात, माजी जि.प.सदस्य बाबुराव काकडे, दत्ता दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई, सरवर पठाण, सोमनाथ गिरगे, रावसाहेब काळे, वसीम फारुकी, सय्यद उरज, शेख अनिस, शेख राजूभाई, शेख मोहसीन, अतिक बागवान, शाहरुख, शेख शाकेर, वैभव दाभाडे, अमित वैद्य, नविद मशायक, कृष्णकांत पाटील, सय्यद राजू, जयसिंग माने, महिला आघाडीच्या सिमा जवंजाळ, जयश्री दाभाडे, पंढरी गोगुले, किरण दाभाडे, शिला पैठणे, योगीता तांबारे, पुजा दाभाडे, संगीता सागडे, सयाबाई ससाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व विशेषतः महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सत्तार साहेब माफीनामा नको, राजीनामा द्या – मा.आ. उषाताई दराडे
बीड : महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची वैचारिक पातळी सत्तेच्या खुर्चीची उब मिळाल्याने घसरली आहे. त्यांचे बेताल वक्तव्य सामाजिक आणि राजकीय वातावरण गढूळ करत आहे. अशा बेलगाम नेतृत्वाला मंत्री म्हणून सरकारमध्ये राहणे हिताचे नसल्याने सत्तार साहेब आपण माफीनामा देऊन उपयोग नाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष उषाताई दराडे यांनी करून सत्तार यांच्याविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केली आहे.
शिंदे सरकारने मंत्री सत्तार यांच्याकडून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा आणि बेताल वक्तव्याची योग्य ती शिक्षा द्यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस अशा बेताल नेतृत्वा विरुद्ध आणि नीतिमत्ता हरवलेल्या सरकार विरुद्ध आक्रमकपणे आपली बाजू जनता दरबारात मांडेल. असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष उषाताई दराडे यांनी देऊन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविरुद्ध बेताल वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करून महिला आयोगाच्या माध्यमातून कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी केली आहे.