सोलापुर येथील शिक्षकाचा दिल्लीत सन्मान!
By MahaTimes ऑनलाइन वृत्तसेवा | नवी दिल्ली
शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण व विशेष योगदानाबद्दल सोलापुर येथील आदर्श शिक्षक नूरअहमद बशीर कारंजे यांना शनिवारी (18 डिसेबर) इंटरनेशनल एजुकेशन अवार्ड 2021 ताज व्हिवोन्टो दिल्ली येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
नूरअहमद बशीर कारंजे सोलापुर येथील यशोधरा प्रशाला येथे सह शिक्षक पदावर कार्यरत आहेत. गेली दोन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानासह अध्ययन, अध्यापनात नाविण्यपूर्ण संशोधनासाठी ते सदैव प्रयत्नरत असतात
तसेच ते कोरोना (Covid 19) कालावधीत लॉकडाऊनच्या (Lockdown) मध्ये इयत्ता 10 वी च्या विदयार्थासाठी विज्ञान (Science) व तंत्रज्ञान (Technology) या विषयाच्या गुगल फॉर्मवर चाचणी व व्हिडिओ तयार केले . व्हाट्सअप व युट्युबच्या माध्यमातून थेठ विद्यार्थी पर्यत पोहोचले. याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना झाला आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा राज्यस्तरीय व जिल्हास्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते कार्य करतात. लॉकडॉउन दरम्यान त्यांनी ज्ञानदानाबरोबरच स्वतः ऑनलाइनच्या (Online) माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा देऊन सातशेपेक्षा अधिक प्रमाणपत्र प्राप्त करुन आपल्या योग्यतेवर जणू कांही शिक्कामोर्तब केले. काल दिल्ली येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार नुकताच त्यांना मेंटोरएक्स, दिल्ली व काईट्सक्राफ्ट प्रॉडक्शन, पंजाब च्यावतीने त्यांना वर्ष 2021 चा अंतर्राष्ट्रीयस्तरावरील मानाचा इंटरनेशनल एजुकेशन अवार्ड पुरस्कार घोषित झाला होता.
दिल्ली येथे 18 डिसेबरला झालेल्या सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार एच. ई. माया हनुमांजी – (भारतातील मॉरिशसचे उच्चायुक्त), एच. ई. हर्वे डी कुलिबली – (कॉन्सुलर प्रकरणांचे प्रमुख, बुर्किना फासो दूतावास, दिल्ली भारत), मिस्टर आल्फ्रेड विली – (मलावीचे भारतातील कार्यकारी उच्चायुक्त), कु.वर्षा जैन – (संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेविका ज्वेल्झ इंटरनॅशनल ज्वेलरी डिझायनर), डॉ. मुनीश जिंदाल – (हॉवररोबोटिक्स चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, संस्थापक अध्यक्ष – मेंटोरएक्स, मेंटोर ऑफ चेंज – निती आयोग, सरकार. भारत) आदि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या आधी त्यांना राज्य (State) व राष्ट्रीयस्तरावरील (National) पुरस्कार (Award) मिळाले आहेत.
महाटाइम्सशी बोलताना आदर्श शिक्षक कारंजे सर म्हणाले की, मी एक शिक्षक असून मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडित आहे आणि विद्यार्थांच्या प्रगति साठी मी सदैव कार्यरत राहिन. हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.