गैरव्यवहाराचा ठपका, बँक प्रशासकाची तक्रार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
अखेर येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्ह्याच्या सहकार, शिक्षण क्षेत्राती दिग्गज सुभाष सारडांसह 28 जणांवर शनिवारी शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
येथील नावाजलेली बँक म्हणून द्वारकादास मंत्री सहकारी बँकेचे वार्षिक लेखा परिक्षणात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर प्रशासक नेमण्यात आल्यानंतर बँकेचे संस्थापक असलेल्या सुभाष सारडयांच्या अडचणी सातत्याने वाढतच असून शनिवारी बँकेतील जुन्या गैरव्यवहार प्रकरणात बैंकेच्या तत्कालीन संचालक मंडळा विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात उच्च न्यायालयानेच थेट पोलीस अधीक्षकांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आणी अखेर शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले. जवळपास 316 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचे समझते.
जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रात नावाजलेली बँक म्हणून द्वारकादास मंत्री सहकारी बँकेची ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बँकेचा कारभार प्रशासकीय मंडळ चालवत आहे. मंत्री बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य तथा लेखा परीक्षक श्रेणी (1) बी.बी. चाळक यांनी शनिवारी सकाळी शिवाजीनगर ठाण्यात तकार दिली. त्यावरुन अध्यक्ष सुभाष सारडा, मुख्य कार्यकारी अधिकारी राधेश्याम सोहनी यांच्यासह 23 संचालक व चार तत्कालीन व्यवस्थापक अशा एकूण 28 जणांवर कलम 420, 477 A नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.