सकाळी 10 वा. सुरू होणार इज्तेमा, सामुहिक दुआ होउन इज्तेमाची सांगता होणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहराच्या नई ईदगाह येथे शुक्र वारी (दि. 28) रोजी तबलिग जमाअतचा बालेपीर भागाचा इज्तेमा संपन्न होणार आहे. शुक्र वारी सायंकाळी मगरीब नमाजनंतर मौलाना साद अब्दुल्ला साहब यांचे मुख्य बयान होणार आहे. बयाननंतर सामुहिक दुआ होउन इज्तेमाची सांगता होणार आहे.
या एक दिवसीय इज्तेमाची सुरूवात शुक्र वारी सकाळी 10 वाजता होणार आहे. दुपारी 2 वाजता जुमा ची नमाज व असर नंतर व मगरीब नमाज नंतर प्रमुख बयान होणार आहे. इज्तेमाच्या पूर्वसंध्येपासुनच जमाअत चे लोक येण्यास सुरूवात झाली आहे.
इज्तेमासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी अल्प दरात जेवण व्यवस्था (50 रू. भरपेट), प्रशस्त शामियाना, वुजूखाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (सबील), तहारत खाना, बैतुल खला, वाहन व्यवस्था आदि व्यवस्था करण्यात आली आहे. या इज्तेमाची तैयारी पूर्ण झाली असुन मुस्लिमबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. इज्तेमा परिसरात खाद्य पदार्थ व वस्तुंची दुकाने लागल्याने ईदगाह परिसर गजबजुन गेला आहे. इज्तेमा सफल व्हावा यासाठी जमाअत से साथी सह शेकडो स्वयंसेवक मेहनत घेत आहेत.
शुक्र वारी सायंकाळी मौलाना साद अब्दुल्ला साहब यांचे मुख्य बयाननंतर सामुहिक दुआ होउन इज्तेमाची सांगता होणार आहे. येथून असंख्य जमात चार महीने व चाळीस दिवसांसाठी जवळपास 50 जमाअत निघणार आहेत. अशीही माहिती आयोजकांनी दिली आहे.
‘जिल्हास्तरीय इज्तेमा’ ची तारिख निश्चित
तबलिग जमाअतचा जिल्हास्तरीय इज्तेमा ची संभावित तारिख निश्चित करण्यात आली आहे. येत्या 8 व 9 डिसेंबर 2022 रोजी बीड येथे जिल्हास्तरीय इज्तेमा आयोजित करण्यात आला आहे. सदर इज्तेमासाठी आयोजन समिती आजपासून तयारीला लागली आहे.