जमीअत उलेमा-ए- हिंदचे आयोजन : हजरत मौलाना मुफ्ती सलमान मन्सूरपुरी यांचे मार्गदर्शन लाभणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जमीअत उलेमा -ए- हिंद च्यावतीने शहरात बुधवार व गुरुवार (दि.26 व 27 ऑक्टोबर 2022 ) रोजी पैगंबरांचे जीवन चरित्र व समाज सुधार या विषयावर आधारित दोन दिवसीय जलसा-ए-आम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नशा मुक्ती, मोबाईल चा गैरवापर यावरही प्रबोधन केले जाणार आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, भारत देशाचे महान धर्मपंडित आणि शेख-उल-इस्लाम यांचे नातू हजरत मौलाना मुफ्ती सलमान मन्सूरपुरी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम जमीअत उलेमा-ए-हिंद चे प्रदेश अध्यक्ष मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी जमीअत उलेमा-ए-हिंद सोलापूर चे जिल्हाध्यक्ष मौलाना इब्राहिम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
असा राहणार दोन दिवसीय कार्यक्रम
बुधवार, 26 ऑक्टोबर : किल्ला मैदान जामा मस्जिद येथे संध्याकाळी असर नमाज नंतर उलेमा आणी दानिश्वरांची बैठक होणार आहे. यात उपरोक्त विषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हदीस आणि न्यायशास्त्राचे शिक्षक हजरत मौलाना मुफ्ती सलमान मन्सूरपुरी हे मगरीबच्या नमाजनंतर संध्याकाळी बशीरगंज राजुरीवेस येथील मरकज मस्जिद मध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
गुरूवार, 26 ऑक्टोबर : फजरच्या नमाज नंतर हजरत वाला यांच्या हस्ते महेबूब उलूम महेबूबिया मस्जिद अख्तर नगर इस्लामपुरा बीडचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी आठ वाजता मोमीन अल बनात अरबी मदरसा जुनाबाजार येथे महिला वर्गाला संबोधित करतील. या कार्यक्र मांना मुस्लिम बांधव -भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन जमीअत उलेमा ए हिंद चे बीड जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला कुरेशी, सचिव मौलाना साबीर व शहराध्यक्ष मौलाना हाफिज वसीम यांनी केले आहे.