सुनक यांच्या समोर ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारण्याचं आव्हान
By MahaTimes ऑनलाइन |
नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ( British PM Rishi Sunak) विराजमान झाले आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ( UK PM ) विराजमान होण्यासाठी शंभर खासदारांचं बहुमत आवश्यक असतं. सुनक यांना 145 पेक्षा जास्त खासदारांचं समर्थन मिळालं. संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान सुनक यांच्या नावाची घोषणा झाली.
माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर होतं. ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. ब्रिटनची आर्थिक स्थिती सध्या डळमळीत झालेली आहे. त्यामुळेच पंतप्रधान लिझ ट्रस यांनी गुरु वारी अचानक राजीनामा दिला.
लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ऋषी सुनक यांचं नाव चर्चेत आलेलं होतं. सुनक यांनीही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधान होण्याचा मानस बोलून दाखवला होता.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांची पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी स्पर्धा सुरु होती. आता लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. सर्वप्रथम बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला, त्यानंतर निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस खुर्चीवर बसल्या. मात्र, त्यांनाही फार काळ सत्ता मिळाली नाही आणि 45 दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक या शर्यतीत सामील झाले आणि यावेळी त्यांना विजय मिळाला.
भारतीयांचा जगभर डंका!
ऋषी सुनक यांची ब्रिटनमध्ये खुप चांगली प्रतिमा आहे. कोरोना काळात केलेल्या कामामुळे अनेकांनी त्यांनी त्यांचं कौतूक केलं होतं. 2015 साली ऋषी सुनक पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर आता ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर विराजमान होणारी भारतीय वंशाची पहिला व्यक्ती असणार आहे.
ऋषी सुनक यांचे भारत- पाकशी नाते
सुनक यांच्या आजी-आजोबांचा जन्म ब्रिटीश-शासित भारतात झाला होता. मात्र, त्यांचे जन्मस्थान पाकिस्तानच्या आधुनिक पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथे आहे. अशा प्रकारे नवीन पंतप्रधान भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही आहे. क्वीन लायन्स 86 या ट्विटर हँडलने ट्विट केले की, ‘सनक गुजरांवाला यांचे पंजाबी खत्री कुटुंब आहे, जे आता पाकिस्तानमध्ये आहे. ऋषी यांचे आजोबा रामदास सुनक यांनी 1935 मध्ये नैरोबीमध्ये लिपिकाच्या नोकरीसाठी गुजरांवाला सोडले. कौटुंबिक माहिती देणार्या क्वीन लायन्स 86 नुसार, रामदास यांची पत्नी, सुहाग राणी सुनक, 1937 मध्ये केनियाला जाण्यापूर्वी गुजरांवाला येथून त्यांच्या सासूसोबत दिल्लीला गेल्या होत्या. ऋषी यांचा जन्म 1980 मध्ये साउथम्प्टनमध्ये झाला.
British politician Rishi Sunak was Monday elected Conservative leader and will become the next prime minister, after rival Penny Mordaunt failed to secure the necessary 100 nominations from her fellow MPs. “Rishi Sunak is therefore elected as leader of the Conservative Party,” senior backbencher Graham Brady said, as Mordaunt vowed her “full support” for the former finance minister.
Rishi Sunak promises ‘stability and unity’
UK PM designate Rishi Sunak has promised that he will make ‘Stability and Unity’ his priority during his first public address as the Prime Minister designate of United Kingdom.
“UK is a great country but we face a profound economic challenge. We now need stability and unity & I’ll make it my utmost priority to bring our party and country together as that’s the only way we’ll overcome challenges &build a better future for our children & grandchildren’, Sunak said.