डॉ. योगेश क्षीरसागर यांचा सवाल
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीडच्या विकासासाठी आम्हाला जे जे करावं लागलं ते आम्ही आजपर्यंत करत आलो आहोत. विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही कधीही राजकारण केले नाही आणि करणारही नाही. जयदत्त क्षीरसागर हे स्वत: विकासासाठी सदैव प्रयत्नशिल असतात जे भूमिपूजन झाले ते देखील या विकासाच्या भूमिकेतूनच झाले. जनतेच्या हिताला आम्ही प्राधान्य दिलं यात आमचं काय चुकल? असा सवाल डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केला आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने जयदत्त क्षीरसागरांचा आता शिवसेनेशी संबंध नसल्याची भूमिका जाहीर केल्यानंतर डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नुकतेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन झाल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या स्थानिय नेत्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या पार्श्वभूमीवर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे की, स्व. केशर काकु क्षीरसागर यांच्या विचाराने चालताना जयदत्त अण्णा आणि क्षीरसागर कुटुंब हे पहिल्यापासून विकासाठी प्रयत्नशील आहे. जनतेचं भलं व्हावं यासाठी पक्ष संघटना यापेक्षाही जनहिताला प्राधान्य दिलं आहे.
ज्या पक्षांसाठी काम केलं त्या पक्षाच्या विरोधात कुठलीही भूमिका घेतलेली नाही. असे असतांला केवल विकास कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहभागी झाल्यामुळे जर कारवाई केली जात असेल तर आम्ही लोकहिताचा विचार करायचा नाही का असा प्रश्न आम्हाला पडत आहे. उद्धव ठाकरे साहेब जर विकासाला प्राधान्य देणारे असतील तर आमचं काय चुकलं हे त्यांनी सांगावं.
जर, विकासाच्या कामासाठी विरोधी पक्षाशी आम्ही पाठपुरावा केला असेल लोकांच्या हिताचे निर्णय होत असतील तर यात गैर काय? असा सवाल ही योगेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे. सोशल मिडीया वर विकास हीच आमची जात विकास हाच आमचा धर्म..! या मथळ्याखाली योगेश क्षीरसागर यांनी आपले मत मांडले आहे.