लोकार्पण व विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित रहा : दत्ता तिपाले, गणेश बुधनर, फेरोज पटेल
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शाहेद पटेल यांच्या पाठपुराव्यातून नांदूर हवेली येथे जिल्ह्यातील एमआरइजीएस मधील पहिली इमारत पूर्ण झाली असून या इमारतीचा लोकार्पण व ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा गुरु वारी ( दि 20 रोजी) सकाळी दहा वाजता आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार इतर मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत आहे.
या लोकार्पण सोहळयासह नांदूर हवेली, खामगाव, हिंगणी हवेली, पारगाव जप्ती येथील ग्राम पंचायत अंतर्गत होणाऱ्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन सोहळयास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते दत्ता तिपाले, गणेश बुधनर,फेरोज पटेल यांनी केले आहे.
शाहेद पटेल यांचा पुढाकार
नांदुर हवेली ग्रामपंचायतीच्या बांधकाम व विविध विकास कामाच्या साठी राष्ट्रवादीचे युवा नेते शाहेद पटेल यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करु न ही कामे मंजूर करु न घेतली. आणि याचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण केले आहे. ग्रामपंचायतीचे काम रोजगार हमी योजनेतून करण्याचा प्रयोग त्यांनी केला. औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केद्रेकर हे मागील महिण्यात बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता इमारत बांधकामाची पहाणी करून कौतुक केले होते.