जिल्हाप्रमुख खांडे यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे आग्रही मागणी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या काढणीस आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.वादळी वार्यासह जोरदार पावसामुळे बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकर्यांचे उभं पीक वाहून गेले या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी बाळासाहेबांची शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेत केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना दिलेल्या निवेदनात जिल्हाप्रमुख खांडे परतीच्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सर्व पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतात उभे असणारे तूर, वेचणीला आलेला कापूस,सोयाबीन तसेच बाजरी,मका या पीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकर्यांना या प्रसंगातून उभे राहण्यासाठी पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी.नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी व संबंधित विभागांना तात्काळ आदेशीत करावे अशी मागणी कुंडलिक खांडे यांनी केली आहे.
जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी शासनाकडे शेतकर्याना मदतची मागणी केली असून त्यानुसार आपन तात्काळ प्रशासनाव्दारे पंचनामे करूण शासनास अहवाल सादर करा असे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी भ्रमणध्वनीव्दारे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना आदेशित केले आहे. असे कुंडलिक खांडे
यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे साहेब शेतकर्यांसोबत- कुंडलिक खांडे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांची आपण भेट घेतली असून मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी शेतकर्यांवर आलेल्या या संकटात आपण शेतकर्यांसोबत असल्याचे आणि त्यांना भरघोस मदत देणार असल्याचे सांगितले आहे.