बीड बायपास वरील संभाजी राजे चौकात घडला अपघात
बीड : भरधाव टेम्पो व मोटारसायकलच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले. हा अपघातात बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बीड बायपास वरील संभाजी राजे चौकात घडला.

या बाबत अधिक माहिती अशी की, बीड हून मांजरसुंबाकडे जाणारी मोटारसायकल (क्र. एमएच 23 एल 1584) व समोरून भरधाव वेगात येणारा टेम्पो (क्र . एम.एच. 15 एफई 1847) यात जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो ने मोटर सायकलला फरफटत डीव्हायडर पर्यंत नेल्याने त्याचा अक्षरश: चुराडा झाला. अपघात एक महिला व व्यक्ती असे दोघेजण जागीच गतप्राण झाले.
प्राथमिक माहितीनुसार या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत कालिदास विठ्ठल जाधव (38, रा. शेलगाव गांजी ता. केज ) तर महिलेचे नाव अनिता भारत सरपते (वय 41, रा. धानोरा रोड बीड ) असे आहे. अनिता सरपते या बिगारी काम करत तर कालिदास जाधव हे बांधकाम मिस्त्री होते.
