अतुल सावे बीड जिल्ह्याचे पालक; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याची जबाबदारी
By MahaTimes ऑनलाइन |
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. जवळपास तीन महिन्यानंतर महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले आहेत. अतुल सावे यांच्याकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याहीचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं नाही.
जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:
देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली
अतुल सावे – जालना, बीड
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
संदिपान भुमरे -औरंगाबाद
तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे- सांगली
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार- हिंगोली
दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
भाजपकडे किती 21 जिल्हे
भाजपकडे 21 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्याचं पालकमंत्री आलेय. मुंबई उपनगर, जालना, बीड, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, धुळे, लातूर, नांदेड, नंदुरबार, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली.
शिंदे गटाकडे 15 जिल्हे
15 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या जबाबदारी शिंदे गटाला मिळाली आहे. सातारा, ठाणे, मुंबई शहर, कोल्हापूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, रत्नागिरी, रायगड,औरंगाबाद, यवतमाळ, वाशिम, नाशिक, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे शिंदे गटाकडे आले आहेत.