वसीमच्या सुटकेची केली मागणी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राज्यभरात पीएफआयच्या कार्यकर्त्यावर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात बीड येथे PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत NIA ने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप करत जोरदार निदर्शने केली. या कारवाईच्या विरोधात शुक्रवारी दुपारी बशीरगंज चौक येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वसीमच्या सुटकेची मागणी केली.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली गुरुवारी राज्यभरात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. दरम्यान एटीएसने पीएफआयचे सदस्य शेख वसीम याला गुरुवारी पहाटे ताब्यात घेऊन नाशिकला नेले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संस्था सातत्याने सामाजिक कार्यात योगदान देत आहे. संस्थेचे पदाधिकारी, सदस्य सामाजिक उपक्रम राबवतात. गुरुवारी देशभरातून संघटनेच्या 100 हून अधिक नेत्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले. दरम्यान एटीएसने बीडचे सदस्य शेख वसीम यांना पहाटे अटक करण्यात आली. नाशिक एटीएसच्या पोलीस अधिकाऱ्याने शेख वसीमला नाशिकला घेऊन गेले मात्र आजतागायत त्यांच्याबाबत कोणताही फोन आलेला नाही किंवा कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शेख वसीमची तात्काळ सुटका करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. स्थानिक पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष फिरोज मोमीन यांनी ही कारवाई म्हणजे संस्थेला बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.