संचालक डॉ. श्रीखंडे यांचे सखोल मार्गदर्शन, विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येथील मिल्लिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरूवारी बीड तालुका दूध डेअरीस भेट दिली तेंव्हा त्यांना खूप कांही शिकायला भेटले. दूध डेअरी व दूध प्रक्रिया उद्योग शैक्षणिक क्षेत्राला मार्गदर्शक ठरला. दरम्यान विद्यार्थ्यांनी दूध संकलन त्यावर कशाप्रकारे प्रक्रि या केली जाते. दुधातील भेसळ, दुधाच्या गुणवत्तेचे मूल्यमापन कसे करायचे याबद्दल माहिती जाणून घेतली.
येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी पाली येथील बीड तालुका दूध डेअरीला (दुग्धालय) ला भेट देउन त्याचे निरीक्षण केले. सूक्षमजीवशास्त्र अभ्यासक्र मात मिल्क मायक्रबायोलॉजी (दूध सूक्ष्मजीवशास्त्र) हा एक महत्त्वाचा पेपर असल्याने ही भेट अभ्यासक्र माचा एक भाग असल्याचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. सीमा हाश्मी यांनी सांगितले.
शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय कसा महत्त्वाचा आहे. तसेच गावकर्यांकडून दूध कसे संकलित केले जाते व नंतर त्यावर कशाप्रकारे प्रक्रि या केली जाते तसेच दुधापासून दही, लस्सी,पनीर व तूप निर्मिती कशी होते याची सखोल माहिती दूध डेअरी चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सूक्ष्मजीवशास्त्राचे डॉ. मोहम्मद असिफ इकबाल, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. शैक्षणिक सहलीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसैनी एस. एस. यांचे मार्गदर्शन लाभले.
कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम शिकणे ही काळाची गरज
आजचे युग हे ख-या अर्थाने विज्ञानाचे युग आहे. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम शिकणे ही काळाची गरज झालेली आहे. महाविद्यालयातील सूक्षमजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी दूध डेअरी भेटी दरम्यान रसायनशास्त्र द्वारे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्र म पूर्ण करून आपण निरनिराळ्या संधी कशा निर्माण करू शकतो. हे विद्यार्थ्यांनी अनुभवले, असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना आपल्या जवळील परिसरातील विविध उद्योगसमूहाचा आदर्श घेऊन त्यापासून चालना मिळेल याची ही विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर पडली.