By MahaTimes ऑनलाइन |
बीड : नवरात्र महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी श्री राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन त्यांना नवरात्र महोत्सवात बस सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी याविषयी त्यांच्याशी चर्चा देखील झाली याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासंदर्भात सूचना दिल्या व याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ असे देखील त्यांनी आम्हाला आश्वस्त केले आहे.
येत्या 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र महोत्सव होणार आहे याबाबत प्रशासनाकडून या नवरात्र महोत्सवा विषयी वेगवेगळ्या उपाययोजना दरवर्षी केल्या जातात परंतु याच उपाय योजनेत मागील काही वर्षापासून पालवन चौक ते खंडेश्वरी या दरम्यान सुरू असणारी बस सेवा बंद करण्यात आली आहे. ही बस सेवा एसटी महामंडळाकडून देण्यात येत होती याबाबत आपण शहरवासीयांसाठी 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत खंडेश्वरी देवी यात्रेसाठी शहरात बस सेवा सुरू केली. तर यात एसटी महामंडळाचा देखील फायदा होईल आणि भाविक भक्तांना देखील बस मुळे त्यांच्या देखील खिशाला कात्री बसणार नाही आणि या उत्सवात मोठ्या प्रमाणावर महिला देखील सहभागी असतात त्यामुळे त्यांना देखील सुरक्षित प्रवासाची सोय होईल.
याबाबत आपण निर्णय घेऊन शहरवासीयांसाठी नवरात्र महोत्सवात खंडेश्वरी देवी येथे जाण्यासाठी बस सेवा सुरू करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते नितेश उपाध्ये यांनी केली आहे यावेळी अँड. विलास जोशी, पत्रकार संजय कुलकर्णी हे देखील उपस्थित होते.