शहरातील रस्त्यांची वाट लागली नगराध्यक्ष, आमदार व जिल्हाधिकारी कधी लक्ष घालणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील रस्ते किती ख़राब झाले जिकडे तिकडे खड्डेच खड्डे झालेले आहे. शिवाजी महाराज चौक ते बालेपीर चराटा फाठ्यापर्यंत रस्ता किती ख़राब झाला या रस्त्यावरुन जिल्हाधिकारी साहेब, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचा सतत ये जा असून यांना ख़राब रस्ता दिसत नाही का? का जानून बुजुन बीडच्या जनतेला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. हा रस्ता तात्काळ बनवावा अशी मागणी लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी केली आहे.
लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धि पत्रकात म्हटले की, शहरातील नगर रोडवर न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, पंचायत समिती, जिल्हापरिषद, एल आय सी, नेहरू युवा केंद्र, बैंका, रजिस्ट्री ऑफिस, ट्रेझरी ऑफिस, जेल, महिला बाल कल्याण ऑफिस, पोलिस मुख्यालय, बांधकाम विभाग, शाळा महाविद्यालय, आय टी आय, दवाखाने, डॉ बाबासाहेब अम्बेडकर भवन, रेस्ट हाउस, चंपावती क्रीड़ा मंडळ, हॉस्टल, विक्रीकर भवन, दारूबंदी ऑफिस अशा शेकड़ो सरकारी खाजगी ऑफिस असून माजी मंत्री, आमदार नगराध्यक्ष व जिल्हाधिकारी यांचे घर असून सुद्धा शहराचे नगराध्यक्ष व आमदार यांचे या नगर रोडकड़े एवढे दुर्लक्ष का? या भागामध्ये माणसं राहत नाही का, या प्रश्नाचे उत्तर दोघा काका पुतन्यान्नी जनतेला द्यावे.
प्रा. इलियास इनामदार यांनी म्हटले की, शहरातील शाहू नगर मोमिन पूरा इस्लाम पूरा मोहम्मदीया कॉलनी शहनशाह नगर जूनाबाजार कारंजा रोड भाजी मंडई बुंदेल पूरा अजीज पूरा शहरातील अनेक रस्त्यांची हिच अवस्था आहे शहरात जिकडे तिकडे घानाच घान आहे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे त्यांचा बंदोबस्त प्रशासनाने लवकरात लवकर करावा कारण मोकाट कुत्रे लहान मुलांना चावत आहे यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नसता लोकसेना संघटना जनआंदोलन करणार असा इशारा लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धि माध्यमाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिला आहे.