गुरूवारी प्रस्थान : उध्दव ठाकरेंना भक्कम साथ देण्यासाठी उल्हास गिरामसह दिडशे शिवसैनिक सहभागी होणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शिवसेना व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भक्कपणे साथ देण्यासाठी बीडचे माजी तालुका प्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्वाखाली येत्या गुरूवार १५ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून बीड ते मुंबई (शिवाजी पार्क) अशी २१ दिवसांची पायी निष्ठा यात्रा काढली जाणार आहे.

या पायी निष्ठा यात्रेला शिवसेना बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडू पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब पिंगळे, विलास महाराज शिंदे, ऍड संगीता चव्हाण, परमेश्वर सातपुते, दिलीप गोरे, उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर, हनुमान पिंगळे, हनुमान जगताप, अशिष मस्के, सुशील पिंगळे, जिल्हा संघटक नितीन धांडे सुनील सुरवसे, विनायक मुळे, प्रल्हाद कांबळे, मकरंद उबाळे, संदीपान बडगे, गणेश मस्के, दीपक काळे संजय उडान, मुकुंद भालेकर, सुरेश तात्या शेठे, सर्जेराव शिंदे, लक्ष्मण ठाकूर हे भगवा झेंडा दाखवणार आहेत. त्यांनतर ही निष्ठा यात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे.
या पायी दिंडीत माजी तालुका प्रमुख उल्हास गिराम यांच्यासह माजी नगरसेवक सुनील अनभुले, शिव सहकार सेनेचे जिल्हा संघटक पंकज कुटे, तालुका प्रमुख गोरख सिंगण, माजी युवा सेना उप जिल्हाप्रमुख सुनील गवते, वरवटीचे संरपच प्रदिप काटुळे, बाळु वैद्य, नंदू जोगदंड, अक्षय काशीद यांच्यासह दिडशे शिवसैनिक सहभागी होणार आहेत.
२१ दिवसाची असणार पायी निष्ठा यात्रा
बीड शहरातुन येत्या १५ सप्टेंबर रोजी ही निष्ठा यात्रा मुंबईकडे मार्गस्थ होत असुन पहिला मुक्काम हनुमान टेकडी नायगाव येथे पहिला मुक्काम, दुसरा मुक्काम धनगरजवळका, तिसरा मुक्काम जामखेड, चौथा मुक्काम आष्टीत तालुक्यातील वटणवाडी, पाचवा मुक्काम चिचोंडी पाटील, सहावा मुक्काम नगर, सातवा मुक्काम नगर तालुक्यातील कामरगाव, आठवा मुक्काम वाढेगव्हाण पारनेर फाटा, नववा मुक्काम रांजणगाव गणपती, दहावा मुक्काम पिंपळे जगताप चौक वांजेवाडी, अकरा मुक्काम भोसेरासे चाकण, बारा मुक्काम भंडारा डोंगर देहु, तेरावा मुक्काम वडगाव मावळ, चौदावा मुक्काम मावळ तालुक्यातील वाकसाई, पंधरावा मुक्काम खोपोली तालुक्यातील साजगाव, सोळावा मुक्काम खानापूर, सतरावा मुक्काम आजीवली, अठरावा मुक्काम खारगर नवी मुंबई, एकोनीसावा मुक्काम वाशी नवी मुंबई, विसावा मुक्काम चुनाभट्टी चेंबुर येथे असणार असुन ५ ऑक्टोबर रोजी दादर शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात निष्ठा यात्रा पोहचणार आहे.
सहभागी शिवसैनिकांसाठी अशा आहेत सुविधा
निष्ठा यात्रेत शिवरथ असुन सहभागी झालेल्या शिवसैनिकांना चहा नाश्तासह दोन वेळेचे जेवन, पावसासाठी रेनकोट, मुक्कामाच्या ठिकाणी ब्लँकेट व सतरंजी, आरोग्यासाठी रूग्णवाहिका व तज्ञ डॉक्टर असणार आहे. सर्व सहभागी शिवसैनिकांचा वैयक्तीक विमा उतरवण्यात आला आहे. अशी माहिती नगरसेवक सुनील अनभुले यांनी दिली.