सोमवारी सुप्रिम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष, सीएए कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : केंद्रीय नागरीकत्व दुरूस्ती कायदा ( सीएए ) च्या विरोधात बीड येथील माजी सभापती अश्फाकइनामदार यांनी सर्वोच्च न्यायालयाच याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर सोमवार दि. 12 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्या.यु.यू. लळीत आणि न्या. एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान मराठवाड्यातून ही एकमेव याचिका अश्फाक इनामदार यांनी दाखल केलेली आहे.

बीड येथील न.प.चे माजी सभापती अश्फाक इनामदार यांनी ॲड. सय्यद तौसीफ आणि ॲड. महेमुद उमर फारूकी यांच्या मार्फत सीएए कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सदर याचिका 2 वर्षांच्या अंतरानंतर सुनावणीसाठी घेतली जात आहे. सदरील दुरूस्ती कायद्याच्या वैधतेला मनमानी आणि भेदभाव करणारी असल्याने ही जनहित याचिका 275/2020 दाखल केल्याचे अश्फाक इनामदार यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयावर विश्वास- अश्फाक इनामदार
केंद्रीय नागरीकत्व दुरूस्ती कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे. विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी बनवलेला नागरीकत्व दुरूस्ती कायदा न्यायालय रद्द करेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
