तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; संतप्त जमावाचा ठाण्यासमोर ठिय्या
By MahaTimes ऑनलाइन |
सोशल मिडियावरून एका समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट करून दोन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी एका तरूणाविरुध्द परळी शहर पोलीस ठाण्यात आज सकाळी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सोशल मिडियावर सदरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संतप्त जमावाने शहर ठाण्यासमोर ठिय्या मांडून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका घेतली होती. पोलीसांनी तातडीने गुन्हा दाखल केल्याने तणाव निवळला.
परळी येथे सोशल मिडियावरील एका आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणावरून आज सकाळी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. सदरील पोस्टमुळे भावना दुखावल्याने समाज बांधवांनी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बालाजी गुट्टे नामक तरुणावर कलम २९५-अ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ च्या ६६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पीआय कस्तुरेंनी चार पथके पाठवून आरोपीला केली अटक सोशल मिडियावरून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी समाजातील जमावाने पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून संताप व्यक्त केला. आरोपीला तात्काळ अटक करा, अशी मागणी केली. परिस्थिती पाहता शहर ठाण्याचे पीआय उमेश कस्तुरे यांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेत आरोपीच्या शोधासाठी चार पथके पाठवली आणि काही तासातच आरोपीला अटक केली.