बीड मध्ये मौलाना खालेद सैफुल्ला यांच्या कार्यक्रमाचे आयोजन
By MahaTimes ऑनलाइन |
देशामध्ये काही लोक द्वेष निर्माण करण्याचा जाणीवपुर्वक प्रेम करत असतात. समाजामध्ये प्रेम, शांती, सद्भावना, बंधूभाव कायम राखण्यासाठी 6 सप्टेंबर रोजी बीड शहरात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जनरल सेक्रेटरी मौलाना सैफुल्ला यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मौलाना हाफीज जाकेर, मौलाना जावेद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मौलाना जाकेर, मौलाना जावेद, मौलाना बाखी, मौलाना अखिल, मौलाना रहीम यांच्यासह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना मौलाना हाफिज जाकेर म्हणाले की, दि. 6 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता किल्ला मैदानावरील जामा मस्जिद व सायंकाळी 7 वाजता राजुरीवेस येथील मर्कज मस्जिदमध्ये मौलाना खालेद सैफुल्ला यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजामध्ये द्वेष भावना निर्माण झाली असून समाजाता कायम शांतता, सद्भावना, बंधूभाव राखण्यासाठी सदरील कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. यामध्ये बदलत्या काळात मुस्लिम समाजाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदरील या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील सुज्ञ, बुद्धीजीवी, विचावंत, राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मजलिस ए उलेमा बीडच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती लाभणार असल्याचेही हाफिज जाकेर व मौलाना जावेद यांनी म्हटले आहे. सर्व जाती धर्माचा बंधूभाव कायम राहावा या दृष्टीकोनातून सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे.