दोन गंभीर जखमी
By MahaTimes ऑनलाइन |
दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दिंद्रुड पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे व त्यांच्या 9 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 30) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास परळी रोड वर झाला.
तर या अपघातात पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे व समोरील कार मधील डॉ. इलियास असे दोघे जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना तात्काळ सिरसाळा पोलीसांनी व नागरिकांनी अंबाजोगाई शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, दिंद्रुड हून परळी कडे जाणारी पांढ-या रंगाची कार (एमएच 14 जीवाय 9113) आणि समोरून येणारी कार (एमएच 47/05326) यांची सिरसाळा नजीक प्रगती मंगल कार्यालया समोर भीषण धडक झाली. समोरील कार मध्ये डॉ. इलियास होते ते परळी शासकीय रूग्णालयाचे असल्याची माहिती समोर येत आहे.
हा अपघात एवढा भिषण होता कि दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूच्या खड्डयात एकमेकावर फेकल्या गेल्या. अपघातातील मयत कोमल शिंदे ह्या दिंद्रुड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून त्या आपल्या आजारी मुलास उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात होत. तर त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे होते जे कार चालवत होते.