शहरातील पाणी पुरवठा दिवसांच्या अंतरात कपात -डॉ.योगेश क्षीरसागर
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अमृत अटल योजनेचे काम आता जवळपास पूर्ण झाले असून शहरवासियांना याचा मोठा लाभ होणार आहे. पाणीपुरवठ्याच्या दिवसांत कपात करण्यात आली असून 5 दिवसाआड शहरवासियांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांचा जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न सुटल्याने बीडकरांना पाणीपुरवठा संदर्भात मोठा दिलासा मिळणार आहे.
डॉ.योगेश क्षीरसागर हे वेळोवेळी शहरातील विविध भागात जावून नागरी समस्या जाणून घेत असतात. यामध्ये नागरिकांकडून प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न उपस्थित केला जात होता. होणार्या पाणीपुरवठ्याच्या दिवसांत कपात करून 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा अशी प्रामुख्याने नागरिकांची मागणी होती. या मागणीचा डॉ.योगेश क्षीरसागर यांनी माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी पाठपुरावा केला होता. परिणामी अमृत अटल योजनेच्या कामाला गती मिळाली. अमृत अटल योजनेचे काम आता जवळपास पूर्ण झाले असून 5 दिवसाआड शहरवासियांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांचा जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न सुटल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
यामध्ये शहेंशाह नगर येथील पाण्याच्या टाकी परिसरातील शहींशाह नगर, चंपावती नगर, खासबाग, झमझम कॉलनी, आतेफ नगर, विद्यानगर प., सह्याद्री हॉटेल परिसर तर बार्शी रोड दूध डेअरी येथील पाण्याच्या टाकीवरून बार्शी रोड, बाजीराव नगर, इमामपूर रोड, बिलाल नगर, प्रकाश आंबेडकर नगर, धानोरा रोड येथील पाण्याच्या टाकीवरून संत नामदेव नगर पूर्व, पश्चिम, कृषी नगर, पंचशील नगर, स्वराज्य नगर, शिवाजी नगर, दत्त नगर, मित्र नगर, आनंद नगर, चाणक्यपुरी, ग्रामसेवक कॉलनी, कालिका नगर, गोरे वस्ती, रोशनपुरा, नगर रोड येथील पाण्याच्या टाकीवरून श्रीराम नगर, जवाहर कॉलनी, शिक्षक कॉलनी, बिंदुसरा कॉलनी, आदर्श नगर, बागवान गल्ली, बालेपीर, भक्ती कन्स्ट्रक्शन, आय.टी.आय मागे., शाहूनगर येथील पाण्याची टाकीवरून पोस्टमन कॉलनी, चक्रधर नगर, सय्यदवाडी, शाहूनगर, पांगरी रोड, पिंपरगव्हाण आदी परिसरात 5 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.तर भविष्यात जसे जसे काम पूर्णत्वाकडे जाईल तसा हा पाणी पुरवठा तीन दिवसाला करण्याचा प्रयत्न राहणार आहे.