मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यभरातील नेते उपस्थित राहणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. विनायकराव मेटे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम भवन येथे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसंग्राम भवन येथेच नागरिकांनी साहेबांचे अंतिम दर्शन घ्यावे असे आवाहन शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी केले आहे.
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. विनायकराव मेटे राजेगाव सारख्या छोट्याश्या गावातुन पुढे आलेल्या नेतृत्वाने संघर्षातुन राज्य काबीज करत अल्पावधीत महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनात स्थान निर्माण केले होते मात्र नियतीने मेटे साहेबांसारख्या अलौकीक नेतृत्वाला हिरावुन घेतले. बीड जिल्ह्याच्यासाठी हा मोठा आघात आहे. सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता जालना रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कॅनॉल रोडवरील सिध्दीविनायक पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी १०.३० वाजता अंत्ययात्रेला सुरूवात होणार आहे. शिवसंग्राम भवन – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक – कारंजा चौक – बलभीम चौक – माळवेस चौक – सुभाष रोड – अण्णाभाऊ साठे चौक – शाहूनगर – अंबिका चौक – अंत्यविधी स्थळ.यादरम्यान अंत्ययात्रा मार्ग असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.
अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या जनतेसाठी पार्किंग व्यवस्था चंपावती शाळा आणि आय.टी.आय. मैदानात करण्यात आली आहे.Beed: The body of Vinayakrao Mete will be taken to his home in Beed by this evening. Mete’s mortal remains will be brought to Shiv Sangram Bhavan from tomorrow 7 to 11 morning for last darshan. Such information has been received from Shivsangram office. After that, the last rites of Vinayak Mete will be done till three o’clock in the afternoon.