जिल्ह्यातील सुजाण नागरिकांनी घरोघरी तिरंगा लावावा – राजेंद्र मस्के
By MahaTimes ऑनलाइन |
ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून भारताला मुक्त करण्यासाठी हजारो देशभक्तांनी क्रांती व अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केला. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचीत्य साधून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात विविध कार्यक्रमाद्वारे अमृतमोहोत्सवी वर्ष उत्साहाने साजरे होत आहे. दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. हर घर तिरंगा अभियानाचा संदेश सामान्य माणसा पर्यंत जावा. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी 13 ऑगस्ट शनिवार रोजी शहरात सकाळी 9.00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, भव्य तिरंगा रॅली बीड शहरातून काढण्यात येणार आहे. अशी माहिती राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
या तिरंगा रॅलीमध्ये निवृत्त लष्करी अधिकारी, जवान, स्वातंत्र्य सैनिक, सर्व धर्मीय गुरुजन, बीड स्काऊट पथक, शिक्षक, प्राध्यापक विद्यार्थी, युवक, महिला व्यापारी आदि सर्व स्तरातील नागरिकांच्या सहभागातून हि रॅली संपन्न होणार आहे. या रॅलीचे नियोजणासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्के, ॲड सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, सलीम जहांगीर, प्रा. देविदास नागरगोजे, विक्रांत हजारी, चंद्रकांत फड, अशोक लोढा, भगीरथ बियाणी, डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, डॉ. जयश्रीताई मुंडे, संग्राम बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत संघर्षयोद्धा भाजपा कार्यालय येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीस अनिल चांदणे, शांतीनाथ डोरले, संदीप उबाळे, प्रमोद रामदासी, संतोष राख, प्रा. सचिन उबाळे, नागेश पवार, विलास बामणे, शरद झोडगे, भूषण पवार, विशाल पाखरे, सुरवसे महाराज, बाबूलाल ढोरमारे,संभाजी सुर्वे, लताताई बुंदेले, मीराताईगांधले, छायाताई मिसाळ, संध्याताई राजपूत, शीतलताई राजपूत, लताताई राऊत, प्रितताई कुकडेजा, नरेश पवार, राजेश चरखा, अम्मू जहागीरदार, महेश भिशे, राम राऊत, कल्याण पवार, अजय ढाकणे, ऋषिकेश फुंदे, अशोक पांढरे, पंकज धांडे, आदि पदाधिकारी उपस्थित होते.