वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठकपाटोदा येथे संपन्न
By MahaTimes ऑनलाइन | बीड
वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद निवडणूक संपुर्ण लढणार असून मोठया ताकतीनिशी मैदानात उतरणार आहेत. वंचितची ताकत काय आहे ती आपण लोकसभेला बघितलीच आहे. विधानसभेला तर काँग्रेस आणि बीजेपीला पुरता घाम फुटला होता. म्हणून आम्ही जिल्हा परिषद इलेक्शन एक उद्देश डोळ्यसमोर ठेऊन लढणार आहोत.लोकशाही मार्गाने, संविधानाला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने. गैरमार्गाचा वापर आम्ही करणार नाही आणि करू सुद्धा देणार नाही.

इतर पक्षाने हे ध्यनात ठेवावं की, तुम्ही सुद्धा गैरमार्गाचा वापर करू नका हे तुमच्या आणि जनतेच्या फायद्याचच नाही. इतके वर्ष बिनबोभाट तुम्ही गैर-मार्गाने निवडूनुका लढलात आणि निवडून आलात. परंतु आता तुमची गाठ वंचितशी आहे.जो समुदाय, ज्या जाती, ज्या धर्मातील लोकांना कधीच राजकारनात संधी मिळाली नाही, अशा लोकांना वंचित बहुजन आघाडी संधी देईल.
प्रस्थापितांना घरी बसवण्याची आता वेळ आली आहे.त्यांना आपण इतक्या वर्षापासून बघत आलो आहोत. वंचित काय करू शकते ते तुम्ही बघाच. म्हणून आम्ही या वंचितांना आवाहन करतो की, तुम्ही राजकारणात येऊ इच्छित असाल तर आवश्य या आणि सत्तेत सहभागी व्हा.

आता वेळ आली आहे सर्व सामान्यांनी राजकारण करण्याची आणि जिकंण्याची यामुळे शुक्रवारी होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही वंचित बहुजन आघाडीचे गोरख झेंड, ज्ञानेश्वर कवठेकर, युनुस शेख, बालाजी जगतकर, अजय सरवदे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केले वंचित बहुजन आघाडी पाटोदा येथे पक्ष निरिक्षक यांचा संवाद बैठक जि.प.पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने निरिक्षकांची बैठकीस आजी माजी कार्यकर्ते, पदाधीकारी मोठ्या संख्ये उपस्थित होते.
