By MahaTimes ऑनलाइन | बीड
कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने राज्यपाल कोश्यारी यांनी घाईगड़बड़ीत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व मी कोणत्याही मार्गाने पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली एक महीना झाला तरी या दोघांनी मंत्रीमंडळ स्थापन केले नाही व दोघेच मंत्रीमंडळाविना महत्वाचे निर्णय घेत आहे.
विनामंत्रीमंडळाच्या सरकारला राज्यपाल, गृहमंत्रालय, पंतप्रधान व राष्ट्रपती यांनी शिंदे-फडणवीस सरकारला बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी केली आहे.
एका महिन्यात चक्क सहाशेच्यावर जीआर (शासन निर्णय) काढणाऱ्या महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या विनामंत्रीमंडळाच्या सरकारला राज्यपाल, गृहमंत्रालय, पंतप्रधान व राष्ट्रपती यांनी बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी व शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या सर्व असवैन्धानिक जीआर शासन निर्णय रद्द करण्यात यावे कारण भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद आहे की एखाद्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येपेक्षा पंधरा टक्के पेक्षा जास्त मंत्रीमंडळ नसावे व कोणताही मंत्रीमंडळ बारा सदस्या पेक्षा कमी नसावे म्हणून महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे या आशयाचे निवेदन लोकसेना राज्यपाल, गृहमंत्रालय, पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे मागणी करणार आहे अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धि माध्यमाद्वारे दिली आहे.