विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन टेक्निकल बायफोकल (व्दिलक्षी) अभ्यासक्रमाची निवड करा
By MahaTimes ऑनलाइन | बीड
11th Admission | काय म्हणता? यंदा 11 वी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 11 वी. टेक्निकल बायफोकल (व्दिलक्षी) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया जून 2022 पासून सुरु झालेली असून महाविद्यालया व्यतिरिक्त इतर महाविद्यालयाचे विद्यार्थांना शासकीय तंञ प्रशाला केंद्र व उच्च माध्य. व्यवसायीक कनिष्ठ महाविद्यालय, नगर रोड,बीड (ITI Campus) येथे प्रवेश घ्यावयाचा असेल तर त्यांनी पुढे दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन शासकीय तंत्र प्रशाला केंद्राचे मुख्याध्यापक बीड यांनी केले आहे.
पालक / विद्यार्थी संपर्कासाठी मोबाईल क्रमांक औरंगे 9766470411, गायकवाड 9881451750, महाले 9403350274, देशमुख 9421425401, वणिरे 9403848163, पांचाळ 7588677752. 11 वीच्या संलग्न महाविद्यालयातून विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन विद्यार्थांनी बायफोकल (व्दिलक्षी) टेक्निकल अभ्यासक्रमाची निवड करावी.या महाविद्यालयात बायफोकलसाठी एकूण 150 जागा उपलब्ध आहेत. त्यात 1 इलेक्ट्रीकल मेंटेनन्स 2. मेकँनिकल मेंटेनन्स 3.स्कुटर मोटार सायकल सर्व्हीसींग करीता प्रत्येकी 50 जागा उपलब्ध आहेत.
या अभ्यासक्रमांतर्गत 11 वी प्रवेशात एक भाषा विषय (मराठी / हिंदी / संस्कृत ) आणि एक वैकल्पिक विषय (Biology- जीवशास्त्र) या ऐवजी व्दिलक्षी अभ्यासक्रमाचे 200 गुणांचा ( 120 गुण प्रँक्टीकल व 80 गुण थेअरी ) एक विषय घेण्यात येतो. व इतर विषय संबंधित / प्रवेशीत कनिष्ठ महाविद्यालयातूनच शिकविले जातात. या वर्षी पासून 12 वी चे गुण व CET /JEE ला मिळालेले गुण हे समप्रमाणात (50 टक्के) पुढील इंजिनिअरींग अथवा अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी धरण्यात येणार असल्याचे नुकतेच सरकारने जाहीर केले आहे.
…ही नऊ कनिष्ठ महाविद्यालये शासकीय तंत्र प्रशाला केंद्राबीडशी संलग्न आहेत
बीड शहरातील चंपावती कनिष्ठ महाविद्यालय, सौ. के एस के कनिष्ठ महाविद्यालय, बंकटस्वामी कनिष्ठ महाविद्यालय, व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालय, इंदिरा गांधी ज्यु काँलेज, वीर सावरकर कनिष्ठ महाविद्यालय, बळवंतराव कदम कनिष्ठ महाविद्यालय (येळंबघाट), आदर्श कनिष्ठ महाविद्यालय, छत्रपती शाहू कनिष्ठ महाविद्यालय. या नऊ कनिष्ठ महाविद्यालय शासकीय तंञ प्रशाला केंद्र व उच्च माध्यमिक व्यवसायीक कनिष्ठ महाविद्यालय बीडशी संलग्न आहेत. संलग्न महाविद्यालयातून विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बायफोकल (व्दिलक्षी) अभ्यासक्रम विषयाची संबंधित संस्थेतील विद्यार्थ्यांनी निवड करावी. यामुळे अभियांत्रिकी (Engineering) अभ्यासक्रम किंवा पाँलिटेक्नीक च्या थेट व्दितीय वर्षास प्रवेशास लाभ होईल.