आर्थिक वर्ष 2021- 22 मध्ये विविध बाबींवर 1.56 कोटी खर्च; 2022 -23 मध्ये 1.81 कोटी रुपये मंजूर
By MahaTimes ऑनलाइन | बीड
राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयी सुधारणांकरिता सहाय्य (आत्मा) अंतर्गत विविध उपयोजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात. यामधून सन 2021- 22 मध्ये केलेल्या कार्यक्रमांबाबत आढावा जिल्हाधिकारी राधबिनोद शर्मा यांना सादर करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात जिल्हाधिकारी श्री शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, राष्ट्रीय कृषी ग्रामिण विकास बँक (नाबार्डचे) व्यवस्थापक टी.एल.मारकड, माविमचे जिल्हा समन्वयक एस.बी.चिंचोलीकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व्हि.बी. देशमुख, कृषि विकास अधिकारी श्री. साळवे, महाबिजचे क्षेत्रीय अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये 2021- 22 या आर्थिक वर्षात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘आत्मा’ चा वतीने करण्यात आलेल्या 1 कोटी 56 लाख रुपये इतक्या निधीतील कामांची माहिती सादर करण्यात आली. यामधून जिल्ह्यातील शेतकरी प्रशिक्षण, कृषी प्रात्यक्षिके, राज्यांतर्गत व जिल्ह्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौरे, शेतकरी गट क्षमता बांधणी, जिल्हास्तरीय मेळावे, कृषी शास्त्रज्ञ सुसंवाद आदी बाबींवर झालेला खर्च मांडण्यात आला. सन 2022 -23 मध्ये आत्मा अंतर्गत 1 कोटी 81 लक्ष रुपये नियोजित कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकरी गट व शेतकरी उत्पादक संस्थांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी देण्यात आली.
