तीन टप्प्यात मुलाखती : दुसर्या दिवशीही इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित
By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे. इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती घेणे सुरू असून दुसऱ्या दिवशीही (दि.13) पडत्या पावसात देखील अनेकांनी मुलाखती देऊन आपला उत्साह दर्शविला.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यासह शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. यातच नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या हालचाली सुरु आहेत. बीड नगरपरिषदेसाठी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नियोजनात्मक कामे सुरू आहेत. दरम्यान मंगळवार (दि.12) पासून गुरूवार (दि.14) पर्यंत शहरातील राष्ट्रवादी भवन याठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या वेगवेगळ्या प्रभागांच्या तीन टप्प्यात तीन दिवस मुलाखती ठरविण्यात आल्या आहेत.
पहिल्या आणि दुसर्या दिवशीही इच्छुकांनी पडत्या पावसात मुलाखतीस उपस्थित राहून आपला प्रचंड उत्साह दाखविला आहे. दुसर्या दिवशी म्हणजेच बुधवारी प्रभाग क्रमांक 2, 6, 7, 8, 16, 17, 18 या प्रभागातील उमेदवारीसाठी मुलाखती पार पडल्या.तर आज प्रभाग क्रमांक 1, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 येथील मुलाखती होणार आहेत.