आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क
By MahaTimes ऑनलाइन | मुंबई
भारतीय हवामान खात्यानं ही माहिती दिली असून पुढील 5 दिवसांत महाराष्ट्रातील याभागात रेड अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांसह नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुढील 4 ते 5 दिवस राज्यात सगळीकडे पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्रसह इतर भागातही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये हवामान खात्याने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुबंईसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि साताऱ्याला रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना तैनात करण्यात आलेल आहे. खबरदारी म्हणून मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्या, शहर आपत्ती पथकाच्या सर्व तुकड्या, नौदल, तटरक्षक दल यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.