बीड शहरातील दोघांना ठोकल्या बेड्या
By MahaTimes ऑनलाइन | औरंगाबाद /बीड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी झालेल्या औरंगाबाद येथील सभास्थळी राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन नांदेड मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांच्या गळ्यातील 200 ग्राम सोन्याचा लॉकिट (सोनसाखळी)अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणी पोलिसांची बीड शहरातील पेठ बीड भागातून दो संशयीतांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 10 लाख रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सिटी चौक पोलिसांना यश आले आहे. अशी, माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
दत्ता श्रीमंत जाधव आणि उमेश सत्यभान टल्ले (दोघेही रा. गांधीनगर झोपडपट्टी, पेठ बीड ता. जि. बीड) अशी गजाआड केलेल्या आरोपींची नावे आहेत. उमेशला बीड येथून तर दत्ताला पुण्यातून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
औरंगाबाद येथे 1 मे रोजी आयोजित केलेल्या राज ठाकरेंच्या जाहीर सभेसाठी मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात मनसैनिक दाखल झाले होते. राज ठाकरेंच्या या सभेत विक्र मी गर्दी झाली होती. ज्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार हे वाहनाने सभेसाठी हजर झाले होते. नांदेड जिल्ह्यातील गोल्डमॅन म्हणून मॉन्टीसिंह जहागीरदार यांची ओळख आहे. मॉन्टीसिंग जहागीरदार हे आपल्या अंगावर जवळपास 50 तोळे सोने नेहमी परिधान करतात. रात्री आठच्या सुमारास राज ठाकरे यांचे आगमन झाले. त्यावेळी प्रवेशद्वारावर गर्दी होती. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची दहा लाख किंमतीची आणि 200 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केली होती.
या प्रकरणी सिटी चौक पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तेव्हा सदरील चोरटे के बीड येथील असल्याचे समोर आले. पालिस निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक कल्याण चाबूकस्वार, जमादार विलास काळे, देशराज मोरे, अभिजीत गायकवाड यांच्या पथकाने बीड येथे शोध घेतला. दरम्यान उमेश यास बीड येथून तर दत्ता पुण्यात अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सोन्याचे लॉकिट (सोनसाखळी) काढून दिले. चोरटे सराईत गुन्हेगार दत्ता जाधव व उमेश टल्ले हे दोघे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सिटी चौक पोलिसांना अनेक वेळा हुलकावणी दिली होती. यावेळी पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
कोण आहेत मॉन्टीसिंह जहागीरदार
मॉन्टीसिंग जहागीरदार हे मूळचे नांदेड येथील येथील रहिवासी आहेत. जहागीरदार हे शेतकरी सुपुत्र असून ते तीन भाऊ आहेत. मॉन्टीसिंग जहागीरदार यांचे नांदेड शहरात विविध व्यापारी संकुल, प्लॉटिंग बिझनेस, फायनान्स कंपनी, हॉटेल्स असा त्यांचा व्यवसाय आहे. तर बीएएलएलबी असे विकलीचे शिक्षण घेतलेले जहागीरदार हे गेल्या 16 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करतात. गेल्या 20 ते 22 वर्षापासून भरगच्च सोन्याचे आभूषणे अंगावर परिधान करतात. त्यामुळे त्यांना नांदेडचा गोल्डनमॅन म्हणून जिल्हाभरात ओळख आहे.