शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली
By MahaTimes ऑनलाइन | बीड
अवैध गर्भपात, गर्भलिंग निदान प्रकरणी सहा जणांविरूध्द गेवराई प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. जिल्हा समुचित प्राधिकारी तथा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या आदेशानुसार वैद्यकीय अधिक्षक तथा तालुका समुचित प्राधिकारी यांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केले आहे.
बीड तालुक्यातील बकरवाडी येथील महिलेचा अवैध गर्भपातानंतर मृत्यु झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, पोलीस उपअधिक्षक संतोष वाळके यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणात मयत महिलेचा पती गणेश सुंदरराव गाडे याच्यासह ६ जणांविरूध्द कारवाई झालेली आहे. आता या प्रकरणी शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या आदेशावरून गेवराईचे वैद्यकीय अधिक्षक यांनी गणेश सुंदरराव गाडे, सुदराव बाबुराव गाडे, (रा.बकरवाडी ता.बीड ) नारायण अशोक निंबाळकर ( श्रृंगारवाडी ता. माजलगाव ), वासुदेव नवनाथ गायके ( रा. आदर्श नगर, बीड ) मनिषा शिवाजी ( रा.अर्धमसला ता. गेवराई ह.मु.गेवराई ) आणि सतिष बाळू सोनवणे ( रा.जाधववाडी औरंगाबाद ) यांच्याविरुध्द गेवराई न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.