देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री !
By MahaTimes ऑनलाइन | मुंबई
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. शिंदे यांच्या गटाला भाजपचा पाठिंबा असेल अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपने एक धक्कातंत्र दिले आहे. नव्या सरकार मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सामिल असतील. नव्या मुख्यमंत्रीचा शपथविधी आज राजभवनात पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. राज्यपालांची भेट घेण्यासाठी दोघेही राजभवनात पोहोचले. एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.
एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. आज संध्याकाळी 7.30 वाजता शपथविधी होणार आहे. पावसामुळे शपथविधी कार्यक्रम थोडक्यात असेल, कार्यकर्त्यांनी गर्दी करून नये तसा प्रवेशही कोणाला मिळणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
NEW Update :
एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहजी, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डाजी, देवेंद्र फडणवीसजी व चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले.