नवीन पिढीसाठी मुश्ताक अन्सारी यांचे कार्य कौतुकास्पद : न्या. ख्वाजा फारूक अहमद
By MahaTimes ऑनलाइन | बीड
टॅलेंट सर्च अकॅडमी ( TSA ) व्हिजन 2030 चा माध्यमाने संचालक मुश्ताक अन्सारी यांनी शिक्षण क्षेत्रात नवीन अध्याय जोडला आहे. असे प्रतिपादन न्यायाधीश डॉ. ख्वाजा फारूक अहमद यांनी टी एस ए मध्ये निवड झालेल्या 64 विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात व्यक्त केले.
TSA 64 मुलांना स्पर्धापरीक्षा पूर्व तय्यारीचे प्रशिक्षण देणार असुन टीएसए चे संचालक मुश्ताक अन्सारी यांनी 64 मुले मुलींना टीएसए स्पर्धा परीक्षा घेऊन 1 वर्षांसाठी सर्व स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी म्हणून सीबीएसई फाउंडेशन कोर्स प्रशिक्षण मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला आला आहे. यासाठी इंदिरा गांधी मेमोरियल स्कूल बालेपीर बीड आई जी एम कॅम्पस मध्ये दोन अत्याधुनिक कक्ष सुसज्ज करण्यात येणार आहे. टी एस ए साठी निवड झालेले 64 मुलांचा सत्कार समारंभ 19 जून रोजी सकाळी 10.30 वा. मा. न्यायाधीश डॉ. ख्वाजा फारूक अहमद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या वेळी डॉ. शेख माजिद (जनरल सर्जन), डॉ. ख्वाजा सिद्दिक अहमद (अनेस्थेसिया तज्ञ), अॅड. शफीक भाऊ (एम आय एम जिल्हा अध्यक्ष बीड), डॉ. नाजिया इजहार (चर्मरोग तज्ञ), डॉ. इम्रान खान (को-ऑर्डिनेटर रहमानी 30), बद्रोद्दिन सर (मिल्लिया ज्युनिअर कॉलेज बीड), इसहाक सर (सचिव, अल फारूक स्कूल), वकील अहमद (सचिव सर सय्यद अहमद खान स्कूल बीड), उमेर सलीम (सचिव मिल्लत ग्रुप ऑफ स्कूल बीड), आदिल सर (मुख्याध्यापक, सर सय्यद अहमद खान स्कूल बीड), शेर खान सर (मुख्याध्यापक, मिल्लीया प्रायमरी स्कूल), सफी अनवरी (मुख्याध्यापक, हजरत मन्सूर शाह स्कूल) , रजिउद्दिन इनामदार सर (मुख्याध्यापक, नॅशनल उर्दू स्कूल इस्लामपुरा बीड), अकील सर (सर सय्यद स्कल), इम्रान सर (मुख्याध्यापक, अल फारूक स्कूल), समीर सर ( मुख्याध्यापक, जयहिंद स्कूल, नासेर सर मुख्याध्यापक न्यू उर्दू स्कूल), नदीम सर (अलहुदा स्कूल) आदी उपस्थित होते.
न्या. डॉ. ख्वाजा फारूक अहमद यांनी प्रतिपादन केले कि टी एस ए चे डायरेक्टर मुश्ताक अहमद अन्सारी हे स्वत: एक प्रतिभाशाली विद्यार्थी राहिलेले आहे. दोन विषयात ते बोर्ड टॉपर होते. त्यांनी टी एस ए च्या माध्यमाने एक अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाचे प्रयत्न सुरू ठेवावे आणि आपल्या आई वडील व गुरूजणांचा मान सन्मान करून पुढे जाण्याचं स्वप्न पहावे. मोबाईल चा वापर मुलांसाठी अनुकूल नाही. यावेळी डॉ. इम्रान, अॅड. शेख शफीक भाऊ डॉ. नाझिया आदिंनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी प्राचार्य सज्जाद अहमद खान इंदीरा गांधी मेमोरियल उर्दू ज्युनिअर कॉलेज, सय्यद अतीक अहमद मुख्याध्यापक पीपल्स उर्दू प्रायमरी स्कूल, शेख मोईन, शाहिद खान मुख्याध्यापक, पीपल्स उर्दू हायस्कूल, हमीद अहमद खान, सय्यद समिउिद्दन मुख्याध्यापक मारुती राव क्षीरसागर माध्यमिक शाळा रायमोह, वसीम अन्सारी प्राचार्य उर्दू ज्युनिअर कॉलेज रायमोहा शिरूर कासार, आयुब सर, सय्यद लयीक अहमद सर, सय्यद नजीर सर, इसहाक सर, आसिफ खान सर, सफवान आसिफ सर, मोलाना फर्मान कास्मी, रईस खान सर, मौलाना हाफिज अब्दुल रऊफ, एजाज खान सर, मोहसीन बेग सर, अबैद सलीम सर, इरफान अन्सारी सर, शमशेर खान, शेरान खान सर, सलीम सर, कलीम सर, मक्सूद सर, समी अन्सारी, सोहेल खान सर, टी एस ए ऑफिस इन्चार्ज सय्यद आमिर सर, आदम सर, अफसर सर, रजीउिद्दन सर, सोहेल सर, अरफात सर, तोसीफ सर, आमिर खान सर , इसा खान, रियाज भाई, आमिर बाबा खान, फरहान सय्यद, मुस्तामिर झमा व सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफने प्रयत्न केले.
टी एस ए इन्चार्ज गुलाम साकिब यांनी सर्व मंन्यावरांचा आभार व्यक्त केले आणि सूत्रसंचालन ची जबाबदारी पार पाडली. यावेळी सर्व 64 विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक उपस्थिती होते.
5 व 7 वी गटातील ‘टॉपर थ्री’ विद्यार्थी
5 वी गट : प्रथम-शेख मोहम्मद हुमैद शेख जावेद पटेल (सर सय्यद अहमद खान स्कूल), द्वितीय -आयिजा फातिमा आबेद सलीम (अडमस इंटरनॅशनल स्कूल) तृतीय- जोहा फातिमा वसीम इनामदार (मिल्लत इंग्लिश स्कूल).
7 वी गट : प्रथम- तहुरा फातिमा शोईब आलम पीरजादे (अल हुदा उर्दू स्कूल), द्वितीय -खान मसीरा रफीक खान (अलहुदा उर्दू स्कूल), तृतीय – काझी मोहमद आफ्फान मेराजोद्दिन (सेंट-ऐंस इंग्लिश स्कूल).
शाळानिहाय टॅलेंट विद्यार्थी संख्या
सर अहमद खान स्कूल 36, मिलिया गर्ल्स स्कूल बीड 8 विद्यार्थी, अलहुदा स्कूल बीड 7, अडेमस इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल 5, मिल्लत इंग्लिश स्कूल 4, सेंट-ऐंस इंग्लिश स्कूल 4, इक्रा उर्दू स्कूल 2, न्यू उर्दू प्रायमरी स्कूल 2, प्रगती मराठी स्कूल 1, पीपल्स उर्दू स्कूल बाले पीर 1, चंपावती इंग्लिश स्कूल 1, , क्रॅडन्स इंग्लिश स्कूल (नारायाना ग्रुप) 1, आझाद हिंद स्कूल 1, अल्फारु क स्कूल 1 या प्रमाणे निकाल लागले.
आठशे विद्यार्थ्यांमधून 64 ठरले पात्र
प्रवेश परीक्षेसाठी 1200 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले होते. 24 एप्रिल 2022 रोजी 5 वी आणि 7 वी चे 800 अल्पसंख्यांक विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित झाले. यामध्ये मेरिटनुसार 64 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या 64 मध्ये 32 मुले आणि 32 मुलींचा समावेश आहे.