पहिल्या दिवशी स्वागताने भारावून गेले विद्यार्थी
By MahaTimes ऑनलाइन | केज
शाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिफळ (वड ) येथील शाळेत पहिल्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका तथा प्राचार्या जयश्री इप्पर मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागताने विद्यार्थी भारावून गेले.
शाम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या आवारामध्ये विध्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या व रंगबेरंगी सूचना फलक अशा सर्वच बाबीकडे अगदी नवलाईने पाहत शाळेमध्ये एन्ट्री घेणारे विध्यार्थी दिसत होते. गेल्या दोन वर्षाच्या काळात कोरोनाच्या महामारीमुळे शाळा कधी चालू तर कधी बंद राहिलाय त्यामुळे विध्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले गेले परंतु त्यामुळे प्रत्येक विध्यार्थ्यांना शिक्षण मिळाले असे झाले नाही. आता या वर्षी पहिल्या दिवसा पासून शाळेत जायचा आनंद व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा आनंद द्विगुणित करत वर्गमित्र गप्पांत रमून गेल्याचे दिसून आले.
शाळेतील प्रत्येक विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येक विध्यार्थ्यांना इमानदारीने शिक्षणाचे धडे द्या अशा सूचना ही मुख्याध्यापिका तथा प्राचार्या जयश्री इप्पर मॅडम यांनी सर्व शिक्षक प्राध्यापक यांना दिल्या.