By MahaTimes ऑनलाइन | बीड
राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील टिप्पण्यांमुळ मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविरुद्ध बीड मध्ये बुधवारी (दि. 15) एफआयआर दाखल झालाय.
टीव्हीवरील चर्चेदरम्यान इस्लाम धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजप नेत्यावर ही कारवाई करण्यात आलीय. यानंतर देश व आंतर्राष्ट्रीयस्तरावर जोरदार विरोध होत आहे. बीड मध्ये ही नुपूर शर्मांच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यातआले. मात्र, तक्रार दाखल करून घेण्यास पोलिस टाळाटाळ करीत होते.
आज, विविध मुस्लिम संगठणांच्या पदाधिका-यांनी पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. गुन्हा दाखल करण्यात विलंब होत असल्याने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. अखेर याप्रकरणी अॅड. अजीम सय्यद यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात IPC चे कलम 295A (धार्मिक भावना दुखावणं), 505-2 ( 2 )अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.