वार्डनिहाय आरक्षण : दिग्गजांची झाली गोची, अनेकांना सुवर्ण संधी
बीड मध्ये 52 (26 प्रभाग), अंबाजोगाई 31 (15 प्रभाग), माजलगाव 26 (13 प्रभाग), परळी 35 (17 प्रभाग), गेवराई 22 (11 प्रभाग) तर धारूर मध्ये 20 (10 प्रभाग) जागेसाठी होणार निवडणूक
By MahaTimes ऑनलाइन | बीड
आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा नगर पालिकांच्या पंचवार्षिक निवडूकीसाठी सोमवारी (दि. 13) 186 सदस्यपदांची वार्डनिहाय आरक्षण घोषित करण्यात आले. बीड सह अंबाजोगाई, माजलगाव,परळी, गेवराई व धारूर या सहा नगर पालिकेत संबंधित नगर पालिकेच्या प्रमुख अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी टाकून आरक्षणाचा ड्रॉ काढण्यात आला. बीड मध्ये 26 प्रभागातील 52, अंबाजोगाई 15 प्रभागातील 31, माजलगाव 13 प्रभागातील 26 व धारूर मध्ये 10 प्रभागातील 20 जागेसाठी होणा-या निवडणूक अनुषंगाने ही आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबीत असून न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नगरपालिका प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.
बीड।
बीड नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज काढण्यात आली. बीड मध्ये 52 जागेंपैकी 26 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून 6 जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव सोडतीत काढण्यात आल्या आहेत. पैकी 3 महिला आणि 3 सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत.
प्रभागनिहाय आरक्षण : प्रभाग क्र . 1 (अ) महिला सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण प्रभाग क्र . 2 (अ) सर्वसाधारण महिला, 2 ब सर्वसाधारण, 3 अ अनुसूचित जाती महिला, 3 ब सर्वसाधारण, 4 अ अनुसूचित जाती महिला, 4 ब सर्वसाधारण, 5 अ सर्वसाधारण महिला, 5 ब सर्वसाधारण, 6 अ सर्वसाधारण महिला, 6 ब सर्वसाधारण, 7 अ सर्वसाधारण महिला, 7 ब सर्वसाधारण, 8 अ सर्वसाधारण महिला, 8 ब सर्वसाधारण, 9 अ सर्वसाधारण महिला, 9 ब सर्वसाधारण, 10 अ सर्वसाधारण महिला, 10 ब सर्वसाधारण, 11 अ सर्वसाधारण महिला, 11 ब सर्वसाधारण, 12 अ अनुसूचित जाती महिला, 12 ब सर्वसाधारण, 13 अ अनिसूचित जाती सर्वसाधारण, 13 ब सर्वसाधारण महिला, 14 अ अनुसूचित जाती, 14 ब सर्वसाधारण महिला, 15 अ सर्वसाधाण महिला, 15 ब सर्वसाधारण, 16 अ सर्वसाधारण महिला, 16 ब सर्वसाधारण, 17 अ सर्वसाधारण महिला, 17 ब सर्वसाधारण, 18 अ सर्वसाधारण महिला, 18 ब सर्वसाधारण, 19 अ सर्वसाधारण महिला, 19 ब सर्वसाधारण, 20 अ सर्वसाधारण महिला, 20 ब सर्वसाधारण, 21 अ सर्वसाधारण महिला, 21 ब सर्वसाधारण, 22 अ सर्वसाधारण महिला, 22 ब सर्वसाधारण, 23 अ सर्वसाधारण महिला, 23 ब सर्वसाधारण, 24 अ सर्वसाधारण महिला, 24 ब सर्वसाधारण, 25 अ सर्वसाधारण अनुसूचित जाती, 25 ब सर्वसाधारण महिला, 26 अ सर्वसाधारण महिला, 26 ब सर्वसाधारण साठी राखीव राहिल. बीड नगरपालिकेची आरक्षण सोडत सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी दयानंद जगताप यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली असून या वेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी जगताप यांना सहकार्य केले.
अंबाजोगाई ।
अंबाजोगाई नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण आज जाहीर करण्यात आले. शहरात एकूण 15 प्रभाग असून त्यात 31 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
अंबाजोगाईत एकूण 15 प्रभाग असून 31 सदस्ये आहेत. या 31 सदस्यात 16 महिला आणि 15 पुरु ष असतील. प्रभाग 1 ते 14 पर्यंत प्रत्येक प्रभागात 1 महिला आणि पुरु ष तर प्रभाग 15 मध्ये 2 महिला आण ि1 पुरु ष सदस्य असेल. अनुसूचित जातीसाठी 5 जागा आरिक्षत असून त्यापैकी 3 महिला असणार आहेत. प्रभागनिहाय आरक्षण खालील प्रमाणे-
प्रभाग 1 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 2- अ महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 3 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 4 अ अनुसूचीत जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 5 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 6 अ महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 7 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 8 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 9 अ महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 10 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 11 अ अनुसूचित जाती ब महिला, प्रभाग 12 अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 13 अनुसूचित जाती ब सर्वसाधारण, प्रभाग 14 महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 15 अ अनुसूचित जाती महिला ब महिला, क सर्व साधारण अशा पद्धतीने आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सभागृहात उपविभागीय अधिकारी शरद झाडगे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी हे आरक्षण जाहीर केले आहेत.
माजलगाव ।
माजलगाव नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण आज सकाळी तहसील कार्यालयामध्ये जाहीर करण्यात आले.
प्रभाग क्र . 1 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र . 2 अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र . 3 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र . 4- सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र . 5 सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र . 6 सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र . 7 सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र . 8 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र . 9 अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र . 10 सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र . 11 अ सर्वसाधारण, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र . 12 अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र . 13 अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण अशा पद्धतीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहेत.
धारूर।
धारूर नगरपरीषद निवडणूकीत दहा प्रभागाचे विस जागाचे आरक्षण आज जिल्हा पुरवठा अधिकारी तथा पीठासीन अधिकारी ओंकार देशमूख, मुख्याधीकारी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रभाग 10 मधील अ जागेसाठी महिला असणार आहेत तर प्रभाग क्र मांक दोन व दहा यामधील महिला ह्या अनुसूचित जाती प्रवर्गातील असणार आहेत तसेच प्रभाग क्र मांक 9 मधील व अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहिलेला आहे.
प्रभाग क्र मांक 1 अ) खुला प्रवर्ग महीला ब) सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्र मांक 2 अ) अनुसूचित जाती महीला एस सी (ब) सर्वसाधारण प्रभाग क्र मांक 3 अ) खुला प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण प्रभाग 4 अ) खुला प्रवर्ग महीला ब) सर्वसाधारण. प्रभाग क्र मांक 5 अ) खुला प्रवर्ग महीला (ब) सर्वसाधारण. प्रभाग क्र मांक 6 अ) खुला प्रवर्ग महिला ब ) सर्वसाधारण प्रभाग 7 अ) खुला प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण . प्रभाग क्र मांक 8 अ) खुला प्रवर्ग महिला (ब) सर्वसाधारण प्रभाग क्र मांक 9 अ) खुला प्रवर्ग महिला ब) अनुसूचित जाती प्रवर्ग प्रभाग क्र मांक 10 अ) अनुसूचित जाती महिला प्रवर्ग ब) सर्वसाधारण अशाप्रकारे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आरक्षण हे चिठ्ठ्या टाकून लहान मुलींच्या हस्ते काढण्यात आले.
गेवराई।
गेवराई नगर परिषदेचे मागील पंचवार्षिक निवडणुकीत 9 प्रभाग होते. या वेळी दोन प्रभाग वाढले. दरम्यान, शहरातील प्रभाग 1 साठी सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग 2 सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग 3 सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग 4 अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग 5 सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग 6 अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग 7 सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग 8 सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग 9 सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग 10 अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग 11 सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण असे 22 सदस्यपदांची आरक्षण चिठ्ठ्या काढून घोषणा करण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी पाटोदा प्रमोद कुदळे व नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसलेंसह नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
परळी।
परळी नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षणात अनुसूचित जाती महिलांसाठी मिलिंदनगर प्रभाग क्र.2 अ, सिध्दार्थनगर प्रभाग क्र.9 अ व शिवाजीनगर प्रभाग क्र.10 अ मिलिंदनगर या जागा अनुसूचित महिलांसाठी राखीव झाल्या आहेत, तर प्रभाग क्र.4 अ, प्रभाग क्र.8 अ, प्रभाग क्र.11 अ या अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी राखीव झाल्या आहेत. उर्वरित प्रभाग क्र.1,3,5,6,7,12,14,15,16,17 या प्रभागातील दोन्ही जागा या सर्वसाधारण व सर्वसाधारण महिलांसाठी सुटल्या आहेत. प्रभाग क्र.13 अ ची जागा अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी, तर एक ब जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाली आहे. प्रभाग क्र. 10 मध्ये तीन जागा असून यात एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव सुटल्याने उर्वरित दोन जागा सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण सुटली आहे.