सुदैवाने या धक्क्यांनी कुठेही पडझड वा जीवितहानी नाही
By MahaTimes ऑनलाइन | अकोला
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी आज (दि.11) शनिवारी सायंकाळी 5 वाजून 41 मि. 18 सेकंदांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. 20.530N आणि 77.080E या अक्षांश रेखांशावर हे केंद्र असूनभूकंपाची तीव्रता 3.45 रिश्टर स्केल इतकी होती.
अकोल्यापासून 23 किमी. अंतरावर बार्शीटाकळी भूकंपाचे धक्के जाणवले अशी माहिती आहे. सुदैवाने या धक्क्यांनी कुठेही पडझड वा जिवीत हानी झाली नसल्याचे ही सांगण्यात आले. याला जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणेने दुजोरा दिला.
मात्र, अनेक ठिकाणी धक्क्यामुळे काही लोक घरातून बाहेर धावले. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.