7 जण जखमी; दोघे गंभीर
By MahaTimes ऑनलाइन | बीड
केज-अंबाजोगाई मार्गावरील होळजवळ गुरूवारी सायंकाळी कार व एपे रिक्षा यांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन लहान बालकांसह चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. जखमीं वर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रु ग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
प्राथमिक माहितीनुसार, प्रवाशी घेऊन जाणारा एपे रिक्षा (एमएच 23 एक्स 5229) चा समोरून येणारी इनोव्हा कार (एमएच 16 सीएन 700) यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात रिक्षाचे दोन तुकडे झाले. तर कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला दाट झाडी- झुडपात घुसली.
या अपघातातील मयतात मच्छिंद्रसिंग चरणसिंग बोके (35, रा. केज), रिक्षाचालक बालाजी संपती मुंडे (28, पिसेगाव ता. केज) व दोन लहान बालकांचा समावेश आहे. तर दोन्ही वाहनांतील आठ जण जखमी झाले. दरम्यान जखमींवर अंबाजोगाई आणि लातूर येथे उपचार सुरु असताना हरजितसिंग बादलसिंग टाक, दीपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके, चंदाबाई बादलसिंग टाक, भारती कौर दिपकसिंग गोके या चौघांचा आज मृत्यू झाल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
या अपघातानंतर तात्काळ ग्रामस्थ व युसूफ वडगाव पोलिसांनी जखमींना रूग्णवाहिका व खाजगी वाहनाने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रु ग्णालयात दाखल केले. अपघातानंतर युसूफवडगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.