भिवंडीच्या जाहिर असदुद्दीन ओवेसी यांचा घणाघात
By MahaTimes ऑनलाइन | भिवंडी
देशात मंदीर – मस्जीदच्या नावावर उत्खनन केले जात आहे. ते वास्तवात मोदींची डिग्री शोधित आहेत, असे एमआयएम सुप्रिमो खासदार बैरिष्टर असदोद्दीन ओवेसी म्हणाले. यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या मंदिर, मस्जिद वादावर आपल्या स्टाइल ने जोरदार पलटवार केला.

शनिवारी भिवंडीमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार इम्तियाज जलील, वारिस पठाण आदिंची प्रमुख उपस्थिती होती. ओवेसी पुढे म्हणाले की, हमारा बाप बाबा आदम हैं.. मुगल हमारे बापनहीं हैं. असे सांगुन ते म्हणाले की, आधी हे सांगा की, देशात बुद्धिस्ट लोकांवर कोणी अत्याचार केला…सम्राट अशोक यांच्या पनतुस कोणी मारले हे सांगा. स्वत: स्वामी विवेकानंद यांनी आपल्या पुस्तकात लिहिलयं की, जगन्नाथ मंदीर बुद्धिस्ट विहार वर बांधले गेले आहे. जर हे खोट असेल तर माझ्यावर कारवाई करा.
सर्वच पक्ष मुस्लिम नेत्यांना जेल मध्ये पाठवत आहेत
भाजपा, शिवेसना, राष्ट्रवादी कांग्रेस, कांग्रेस असो की समाजवादी पार्टी सर्वच पार्टीच्या प्रमुख नेत्यांना आपण सुरक्षित रहावे, स्वत:ला जेल मध्ये जावे लागू नये असे वाटते. यासाठी वाटेल ते करतात. मात्र त्यांच्याच पार्टीतील मुस्लिम नेत्यांना तुरंगात पाठवायला मागेपुढे पाहत नाहीत. राष्ट्रवादी कांग्रेस चे नेते जसे संजय राऊत यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून प्रयत्न करतात तर दूसरीकडे नवाब मलिक त्यांना आठवत नाही. त्यांना बाहेर काढण्याबाबत काहीच बोलत नाही असा सवाल ही एमआयएम सुप्रिमो खासदार बैरिष्टर असदोद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले की, विविध आरोपाखाली हे नेते महाराष्ट्रातील तुरंगात बंद आहेत या सर्व निर्दोर्षांची मुक्तता करा अशी मागणी ही खा. ओवेसी यांनी केली. मिडीया रिपोर्टचा दाखल देत त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी कांग्रेस चे नेते शरद पवार हे दिल्ली दरबारी जाऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कारवाई नको, त्यांना जेल मध्ये टाकू नये अशी विनंती करतात मात्र, त्यांना यावेळी नवाब मलिकांचा विसर पडतो. ते का आठवत नाहीत संजय राऊत हे नवाब मलिक पेक्षा जास्त असा सवाल उपस्थित केला.
