मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या निवास वास्तूचे पंकजाताईंच्या हस्ते पूजन
By MahaTimes ऑनलाइन | बीड
मी कधीही कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. मला फक्त वंचित दिसतात. विकासात कधीही भेदभाव केला नाही. यामुळेच आज कुठलेही पद नसताना. लोक माझ्याकडून अपेक्षा करतात. हीच माझ्या कामाची पावती. पदापेक्षा आशीर्वाद महत्वाचे. नारायण गडाच्या प्रती मी पूर्णपणे बांधील आहे. गडाकडून माझ्या काहीही आशा, अपेक्षा नाहीत. गडाची लेक आहे, भक्त आहे. नारायण गडाच्या विकासासाठी पंधरा लाख नव्हे, पंधरा कोटींचा निधी देण्याची शक्ती मला मिळावी. जनसेवा करण्याचे बळ मिळावे. सर्व सामान्य जनता आणि नारायण गडाचे आशीर्वाद पाठीशी असावेत असे भाजप नेत्या पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी दिलेल्या पन्नास लक्ष रु.निधीतून श्री क्षेत्र नारायण गड येथे, आज मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांच्या निवास वास्तूचे पूजन पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच केतुरा- नारायणगड- पौंडूळ रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

महंत शिवाजी महाराज यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल दादा जगताप, संत तुकाराम महाराज संस्थांचे मठाधिपती संभाजी महाराज, गडाचे विश्वस्त सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जगताप, दिलीपराव गोरे, महादेवराव तुपे, बी.बी.जाधव, बळीराम गवते, गोवर्धन काशीद, नवनाथ शिराळे, डॉ. जयश्री मुंडे, जि.प. सदस्य रामराव खेडकर, वैजिनाथ मिसाळ, रामदास बडे, सौ. जयश्रीताई मस्के, उप सभापती जालिंदर सानप, डॉ.मधुसूदन खेडकर, सलीम जहांगीर, सुरेश उगलमुगले, नारायण राव बडे, प्रकाश खेडकर, किरण परजणे, प्रल्हाद ननवरे, बालाजी पवार, विजयकुमार पालसिंगकर, विक्रांत हजारी, जगदीश गुरखुदे, शांतीनाथ डोरले, सचिन उबाळे, शरदराव सानप, किरण बांगर, विष्णुपंत सुरवसे, सुधाकर चव्हाण, कल्याणराव पवार, प्रल्हाद धनगुडे, विवेक पाखरे, भीमराव बेलदार आदि मान्यवरासह नारायणगड परिसरातील भक्तगण, कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते.
महंत शिवाजी महाराज म्हणाले, तुमच्या ताई पण, त्या आमच्या आई आहेत
अध्यक्षीय भाषणात महंत शिवाजी महाराज यांनी नगदनारायणच्या दरबारात, पंकजाताईंच्या कार्याचे आणि लोकप्रीयेतेचे कौतुक केले. तुमच्या ताई आहेत. पण, त्या आमच्या आई आहेत. असे गौरोद्गार काढून पंकजा ताईंना मातेची उपमा दिली. पंकजाताईंचे अंतकरण मोठे आहे. गडाच्या या नातीचे प्रेम असेच नारायण गडावर राहो. देऊ नका घेऊ नका पण, प्रेमात बदल करू नका हे प्रेम अखंड नांदावे हेच नगदनारायणांचे आशीर्वाद.

राजेंद्र मस्के म्हणाले, पंकजाताईंकडून विकासाचे राजकारण
पंकजाताईंनी ग्रामविकास खात्यातून तीर्थक्षेत्रांच्या सढळ हाताने निधी दिला. कोणताही भेदभाव न करता. विकासाचे राजकारण करत समान न्याय दिला. स्वत: महंत शिवाजी महाराज यांना मंत्रालयात आमंत्रित करून, तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमोर महाराजांच्या साक्षीने गडाचा विकास आराखडा मांडला. ज्या दिवशी गहिनीनाथ गडाला 25 कोटी निधी मंजूर केला. त्याच दिवशी नारायण गडाला 25 कोटी निधी मंजुर केला.
या कार्यक्रमा प्रसंगी विश्वस्त माजी आमदार राजेंद्र जगताप, दिलीपराव गोरे, अनिल दादा जगताप, यांनी मनोगत व्यक्त करून ताईंचे आभार मानले.
