पत्रकार, अधिकारी, व्यापारी व लोकप्रतिनिधीसाठी बुधवारी खास शो – अनिल जगताप
By MahaTimes ऑनलाइन | बीड
लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता प्रसाद ओकने साकारलेल्या आनंद दिघेंची झलक बघून तर सर्वजण अवाक् झाले आहेत. केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर आनंद दिघे नजरेतील ती जरब, चेहऱ्यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी एवढं लिलया साकारलं आहे की साक्षात दिघेंनाच पडद्यावर बघितल्याचा भास होतोय...
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. शिवसैनिक तथा एका जिल्हाप्रमुखावर आधारित हा उत्तम चित्रपट सगळ्यांनी पाहावा म्हणून बीड जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी तब्बल पाच दिवस पाच शो मोफत ठेवल आणि सहावा शो बुधवार दि 25 रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांसाठी खास शो आयोजित केल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले आहे.
बीड जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी तब्बल पाच दिवस पाच शो मोफत ठेवल आणि सहावा शो दुपारी 3 वाजता हा विशेष शो संपन्न होईल. यासाठी शिवसेना कार्यालय साठे चौक या ठिकाणाहून तिकीट वाटत होईल. लोकप्रतिनिधी, पत्रकार, व्यापारी, अधिकारी यांच्या तिकीट वाटपानंतर ची शिल्लक तिकिटे उर्वरित जनतेसाठी असतील असे शिवसेना कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचा जीवनपट, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असणारी निष्ठा, समाजातील वाईट प्रवृत्तीच्या विरोधातील लढा या बाजू भक्कमरित्या या चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. हा चित्रपट प्रत्येकांनी सह कुटुंब आवर्जून पाहावा असे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.