विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने ‘खुदाई खिदमतगार’ चा भव्य सन्मान
By MahaTimes ऑनलाइन | पुणे
विश्व मानवाधिकार परिषद संस्थेची राष्ट्रीय परिषद आणि पुरस्कार वितरण समारंभात बीड येथील खुदाई खिदमतगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष पठाण अय्युब तूराब खान यांना उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विश्व मानवाधिकार परिषद संस्थेची राष्ट्रीय परिषद आणि पुरस्कार वितरण समारंभ पुणे येथील डॉ. शेख असेंब्ली हॉल आजम कॅम्पस येथे नुकताच संपन्न झाला. हा समारंभ अद्भूत आणि ऐतिहासिक ठरला. पुण्यातील प्रसिद्ध शिक्षण महर्षी पी.ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी अमन महाराज, विश्व मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एम.आर.अन्सारी, मुख्य सल्लागार आय ए एस जामा, राष्ट्रीय उपाध्यक्ष मौलाना अन्वर-उल-हक, राष्ट्रीय मुख्य सचिव प्रसून गोस्वामी, सरचिटणीस अधिवक्ता मेराज अन्सारी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी सय्यद लाइक, शेख हमीदुल्ला, आंध्र प्रदेशचे शेख मुजफ्फर अली, अन्वर खान, छत्तीसगडचे नियाझ खान, पश्चिम बंगालचे मोस्मी भट्टाचार्य, एसके सिराज उल हसन, सलाहुद्दीन गौरी, एमडी मारूफ, श्री राम, हाजी फैज शेख, डॉ परवीन, नमशान अन्सारी राजस्थान, जम्मू-काश्मीर बलराम. शर्मा, मध्य प्रदेशातून मोईन अख्तर खान, मोहम्मद नईम, एस.के. रहमान, तेलंगणातून मोहम्मद अली, पंजाबचे डॉ.एस.के. कंबोज, महाराष्ट्रातून राज्य सचिव डॉ.सिराज खान आरजू, मराठवाडा अध्यक्ष एडोकेट सय्यद साजेद, नावेद शेख, श्री.चव्हाण, सय्यद शोएब, शेख आखिब आदिसह पुणे शहरातील विविध सामाजिक व राजकीय मान्यवर उपस्थित होते
या समारंभात देशभरातील विविध सामाजिक संस्थांना तसेच आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या मध्ये बीड येथील अय्युब खान यांनी कोरोना काळात ‘खुदाई खिदमतगार’ सोशल फाउंडेशन महाराष्ट्रच्या माध्यमाने केलेल्या समाज कार्यांची दखल घेऊन पठाण अय्युब खान यांना उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.