नेत्ररोग तज्ञ डॉ. राधेश्याम जाजु यांनी अंत्यविधीचा खर्च उचलला
By MahaTimes ऑनलाइन | बीड
महाराष्ट्रात तिकडे मंदिर-मस्जिदवरील भोंग्यावरून जातीपातीचे वातावरण सुरू असताना व्यक्तीवर नेत्ररोग तज्ञ डॉ. राधेश्याम जाजु यांच्यासह मुस्लिम पत्रकारांनी एकत्र येऊन आर्थिक दृष्टया दुर्बल असलेल्या एका मयत व्यक्तीवर हिंदू समाज रीतिरिवाज पद्धतीने येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी केला. माणुसकीच्या दृष्टीकोनातून एका दुर्बल कुटुंबाला केलेली मदत सर्व समाजापुढे आदर्श निर्माण केला असून जातीय बीज पेरणाऱ्यांनाही सणसणीत चपराक लगावली आहे.

गेल्या आठ दिवसापासून बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले लखन मारुती जाधव ( वय 50 ,रा. रिलायन्स पंप जवळ बीड ) यांचे दि. 20 मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या अंत्यविधीचा प्रश्न समोर आला. मात्र मयत लखन जाधव यांना मूलबाळ नसल्याने अंत्यविधी करायचा कसा असा प्रश्न निर्माण झाले. घरची परिस्थिती अतिशय बिकट त्यामुळे अंत्यविधीसाठी पुढे कोण येणार, खर्चाचे काय? असाही प्रश्न उपस्थित झाला.
ही बाब नेत्ररोग तज्ञ डॉ. राधेश्याम जाजू यांना कळाली त्यांनी माणुसकीच्या दृष्टीने अंत्यविधीचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. तर पत्रकार रफिक पठाण, शेख वसीम, पत्रकार अमजदखान, वाहन चालक शेख शाहिद, वाहन चालक रोहिदास घाडगे आदींनी बीड येथील भगवानबाबा प्रतिष्ठान जवळील स्मशानभूमी अंत्यविधीची तयारी केली आणि 21 मे रोजी सकाळी मयत लखन जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या माध्यमातून डॉ. राधेश्याम जाजू यांच्यासह पत्रकार रफिक पठाण, शेख वसीम, अमजदखान, वाहन चालक शेख शाहिद, वाहन चालक रोहिदास घाडगे यांनी दाखवलेली माणुसकी आज इतरांपुढे आदर्श निर्माण करणारी आहे.