By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीड नगर पालिकेची निवडणुक अनुषंगाने प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आला होता. प्रभाग क्र.16 बाबत माजी नगरसेवक शेख जमील यांनी 15 मार्च रोजी जिल्हाधिकार्यांकडे आक्षेप नोंदविला होता. या मागणीची दखल घेत मा.जिल्हाधिकार्यांनी प्रभागाचा स्पॉटपंचनामा करून अहवाल सादर करण्याचे नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना आज ( दि.19 ) रोजी आदेश दिले आहेत.
बीड नगर पालिका निवडणुक अनुषंगाने प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आला होता. यामध्ये जुने प्रभागांची फेर रचना होवून काही नवीन प्रभाग तयार झाले होते. यामध्ये प्रभागात मोठया प्रमाणात बदल झाला. यात बरीच जुने भाग नवीन प्रभागात जोडले गेले. याबाबत काही जणांनी आक्षेप घेतला होता. याच अनुषंगाने आता प्रभाग क्र.16 ची नवीन रचना झाली. तो पुर्वीचा हा प्रभाग 14 होता. यामध्ये शिवाजी पुतळा ते राजुरी वेस, शिवाजी महाराज पुतळा ते राष्ट्रवादी भवन, लेंढी रोड, तकीया मस्जिद, तेरवी लाईन, राजुरी वेस मधील भाग समावेश होता.
परंतु नवीन प्रभाग रचना नुसार यामध्ये तेरवी लाईन पश्चिम बाजु, रिपोर्टर कार्यालयासमोर सुंदर मेडीकल पर्यंतचा भाग वगळण्यात आला आहे. ह्या प्रभागात सन 1985 पासून ते 2016 पर्यंत वार्ड किंवा प्रभाग यामध्ये बदल झाला नव्हता. आजही वरील वगळण्यात आलेला भाग याच भागाशी संबंधीत असुन जोडलेला असतांना सदरील भाग हा प्रभाग क्र.17 मध्ये सामाविष्ट करण्यात आला आहे. याबाबत माजी नगरसेवक शेख जमील यांनी जिल्हाधिकार्यांकडे दि.15 मार्च रोजी आक्षेप नोंदविला होता.
या मागणीची दखल घेत मा.जिल्हाधिकार्यांनी प्रभागाचा स्पॉटपंचनामा करून अहवाल सादर करण्याचे नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना आज दि.19 मे रोजी आदेश दिले आहेत. मागणीची दखल घेतल्यामुळे शेख जमील यांनी जिल्हाधिकार्यांचे आभार मानले आहेत.