शिवसंग्रामच्या ईद मिलाप ने मुस्लिमांची मने जिंकली
By MahaTimes ऑनलाइन | बीड
मुस्लिम समाज सर्वच क्षेत्रात पीछाडीवर आहे. मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण, शिक्षण गरजेचे आहे. मुस्लिम समाजाच्या प्रत्येक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका असून आता यापुढे मुस्लिम समाजाच्याहितासाठी माझा व पक्षाचा आवाज बुलंद असेल अशी ग्वाही शिवसंग्राम चे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी मंगळवारी ईद मिलाप कार्यक्रमात बोलतांना दिली.
शिवसंग्राम पार्टीच्यावतीने शहरातील मिल्लीया महाविद्यालय मैदानात ईद मिलाप कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करतांना श्री. मेटे यांनी वरील विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ समाजसेवक हाजी अब्दुल खालेक पेंटर, मोईन मास्टर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, अॅड. सय्यद अजहर अली, फारूख पटेल, केजीएन ग्रुप चे प्रदेश अध्यक्ष जहीरअली शाह कादरी, कोलंकडे आप्पा, अॅड. अविनाश गंडले, काझी जफर साहब, मुसा खान, नगरसेवक शेख अमर, पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, रिपाइंचे किशन तांगडे, राजू जोगदंड, शेख खमर, शेख खलील, कामरान शेख, रफीक कुरेशी, संपादक शेख मुजीब, रईस खान, अबुबकर चाऊस, आयुब पठाण, प्रा. जावेद पाशा, शेख ताहेर आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार मेटे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने देखील शिक्षणात मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्यास काहीच हरकत नसल्याचा निर्वाळा नोंदविला आहे. यापूर्वी वेळोवेळी नियुक्त सर्वच आयोग, समित्यांनी आरक्षण देण्याची शिफारस केलेली आहे. असे असतांना सरकार याची अंमलबजावणी का करीत नाही असा सवाल श्री. मेटे यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक आमदारांनी आतापर्यंत मुस्लिम बहुल भागांसाठी किती निधि खर्च केला? असा प्रश्न विनायक मेटे यांनी उपस्थित केला. मुस्लिम समाजाचा केवळ मतापुरता वापर केला जातो. आता त्यांनी गाफील राहू नये असे ही मेटे म्हणाले.
राज्यामध्ये आणि देशांमध्ये धर्मा -धर्मा मध्ये आणि जाती – जाती मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हनुमान चालीसा आणि भोंग्याचा वाद निर्माण केला जात आहे परंतु खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजातील तरूण हे सुशिक्षित असल्याने त्यांनी देश व महाराष्ट्र शांत ठेवला आहे. याचे संपूर्ण श्रेय मुस्लिम बांधवांना जाते. मुस्लिम बांधवांनी संयमी आणि शांततेची भूमिका घेतल्याबद्दल तमाम मुस्लिम बांधवांचे कौतुक व अभिनंदन केले.
या कार्यक्रमास भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद, युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैया मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, राहुल मस्के, सुनिल शिंदे, शेषेराव तांबे, आनंद जाधव, राहुल बनगर, प्रशांत डोरले, अनिकेत देशपांडे, गोपीनाथ देशपांडे, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, मच्छिंद्र कुटे, मनोज जाधव, कैलास शेजाळ, अखिल भाई, कुतुब भाई, अबेद भाई, शेख नदीम शेख गनी, नदीम पटेल, सलमान अली, जाकीर हुसेन, ईकबाल रहमान, अख्तर पेंटर, शेख अजहर, अमजद पठाण, राजू पठाण, मोहम्मद बागवान, फिरोज पठाण, इमरान जागीरदार, शेख लालाभाई, सुरेश बावळे, ज्ञानेश्वर कोकाटे, अँड.गणेश मोरे, मुकुंद गोरे, सातिराम ढोले, हनुमंत पवार, अक्षय माने, अंकुश बुंदेले, संतोष चौधरी, हरिश्चंद्र ठोसर, हरीश शिंदे यांच्यासह शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ऐक्याचा मिलाप
राज्यात भोंग्यावरून वातावरण ढवळून निघाले आहे. अशा स्थितीत विनायक मेटे यांनी ईद-ए-मिलाप कार्यक्र माचे आयोजन करून हिंदू मुस्लिम बांधवांना एकाच मंचावर आणून ऐक्याचा मिलाप घडविला. या ईद मिलाप कार्यक्रमात विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिका-यांसह शहरातील प्रतिष्ठित, सामान्य नागरिकांनी हजेरी लावली.