By MahaTimes ऑनलाइन | बीड
बीडचे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांची बदली झाल्यानंतर मागील एक महिण्यांपासुन हे पद रिक्त आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बसविण्यासाठी शासनाने बीडला तात्काळ पूर्णवेळ अधिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी लोकसेना संघटनेचे प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रा. इलियास इनामदार यांनी म्हटले आहे कि़, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे आरोप होत होते. तशी परिस्थिती ही उदभवली होती. तशा गंभीर घटना ही एकापाठोपाठ एक घडल्या होत्या. स्थानीय लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा उचलून धरत विधानसभा व विधानपरिषेदत आवाज उठविला होता. या सर्व घडामोडी पाहता शासनाने तत्कालीन पोलिस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवित नंतर मागील महिण्यात त्यांची पुणे येथे बदली केली.
यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार साहेब यांच्याकडे पोलिस अधीक्षकांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. त्यानंतर पुणे येथील सीआयडी विभागाचे आयपीएस अधिकारी पंकज देशमुख साहेब यांच्याकडे अतिरिक्त बीड पोलिस अधीक्षकाचा पदभार देण्यात आलेला आहे. हे दोन्ही अधिकारी आपली जबाबदारी पार पाडीत आहेत.
मागील कांही महिण्यात जिल्ह्यात मटका, अवैध दारू, जुगार, अवैध वाळूचे धंदे, बेकायदेशीर सावकारी, गुंडागर्दी, अवैध राकेलचे धंदे अशाप्रकारची गुन्हेगारी बघायाला मिळते. म्हणून कायदा-सुव्यवस्था अबाधित रहाण्याकरिता रिक्त पोलिस अधीक्षक पदावर पूर्णवेळ आयपीएस अधिकाºयाची नियुक्ती करावी अशी लोकसेना संघटनेने केली आहे.